shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा.

जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा.
इंदापूर: १५ ऑक्टोबर डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.प्रथम विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आरती गायकवाड व अमित भोंग यांनी वाचनाचे महत्त्व, फायदे,प्रकार याबाबत माहिती दिली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर वर अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.मुलांनी गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन केले.वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी हा उद्देश आहे असे मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी सांगितले.
            वाचन प्रेरणा दिनाबरोबरच जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.अमित भोंग यांनी मुलांना हात धुण्याच्या पायऱ्या सांगितल्या. हात धुण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले.आरती गायकवाड यांनी हात धुण्याचे महत्व सांगितले. दोन्ही उपक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले.
close