shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची घोडेगाव -चांदा येथील बेकायदा दारु अड्यांवर छापेमारीप्रतिनिधी मोहन शेगर सोनई ..

सोनई :-
 -- नेवासा तालुक्यातील घोडेगाव तसेच चांदा या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू अड्यावर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. दि. १६ आॅक्टोबर रोजी घोडेगाव येथील दिपक काशिनाथ कुऱ्हाडे वय ४९ हा विना परवाना बेकायदा गावठी दारू ४००० रुपये किंमतीची ४० लिटर दारू बाजारपेठेत असलेल्या मुजो़ंबा मंदिरा लगत असणाऱ्या घरात विक्री करताना आढळुन आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोना. सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादी वरुन ४२३/२०४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे काॅ. एम आर आडकित्ते हे करत आहेत. दुसरी कारवाई घोडेगाव येथील दिपक रमेश कुऱ्हाडे वय ४० हा बाजार तळा जवळील टपरी मध्ये ५००० रुपये किंमतीची ५० लिटर  गावठी तयार दारू विना परवाना बेकायदा विक्री करताना आढळून आला. अहिल्यानगर येथील सायबर सेल चे पो काॅ. विशाल तनपुरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र नं ४२४/२०२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे काॅ दत्ता गावडे हे करत आहेत. तिसरी कारवाई देखील घोडेगाव येथील संजय एकनाथ गायकवाड  वय ४६ रा एकलव्य नगर हा येथील एकलव्य नगर मध्ये विनापरवाना बेकायदा ५००० रुपये किंमतीची तयार गावठी दारू व १५०० रुपये किंमतीचे दारू तयार करण्यासाठी चे रसायन ३०० लिटर असा एकुण २०,००० रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. पो. काॅ. विशाल तनपुरे यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र नं ४२५/२०२४ कलम ६५ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे काॅ. एम. आर आडकित्ते हे करत आहेत. चौथी कारवाई चांदा येथील अश्या निसार शेख वय ४४रा कसाई मोहल्ला चांदा हा बाजार तळा जवळील एका टपरी मध्ये विना परवाना ८००० रुपये किंमतीची ८० लिटर तयार गावठी दारू विक्री करताना आढळुन आला. पो. काॅ. विशाल तनपुरे यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र नं ४२८ /२०२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास पो हे काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत. पाचवी कारवाई चांदा येथील गोरख लक्ष्मण दहातोंडे वय ४२ रा. माळगल्ली चांदा हा आपल्या राहत्या घरामध्ये १०,०००रुपये किंमतीची १०० लिटर तयार गावठी दारू विक्री करताना आढळुन आला होता. पोना. संदीप दरंदले यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र.नं.४२७/२०२४ कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे काॅ. एम आर आडकित्ते हे करत आहेत.
close