shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कष्टाच्या वाटा" बाल कथासंग्रहाचे प्रकाशन


पैठण / प्रतिनिधी:
 पैठण तालुक्यातील प्रसिध्द साहित्यिक तथा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कवी श्री. अय्युब पठाण लोहगावकर यांच्या "कष्टाच्या वाटा " या दर्जेदार व आशयघन बाल कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने आणि वाचन-प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून छ्त्रपती संभाजीनगर येथे प्रख्यात साहित्यिका श्रीमती अलकनंदा घुगे- आंधळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीमती अलकनंदा घुगे- आंधळे म्हणाल्या की, " साहित्यातून माणसे वाचता आली पाहिजे. अय्युब पठाण यांनी  " कष्टाच्या वाटा " तून बाल मनाची मानसिकता ओळखून बालकांना आपल्याशा वाटणाऱ्या कथांचे लेखन केलेले आहे." याप्रसंगी मुख्याध्यापक धनंजय नागमवाढ यांनी अय्युब पठाण यांचा शाल- पुष्पबुके देऊन सत्कार केला.या प्रकाशन सोहळ्याला धनंजय नागमवाढ, देविदास काळे, शालीमन शिंदे, इलियास शेख , अबुजर पठाण, मुदस्सर पठाण, श्रीमती ज्योती ढोमणे, अश्विनी मोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११


पैठण - प्रसिद्ध बाल  साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांच्या "कष्टाच्या वाटा " या बाल कथासंग्रहाचे प्रकाशन करतांना (मध्यभागी) अलकनंदा घुगे- आंधळे, समवेत लेखक अय्युब पठाण लोहगावकर, मुख्याध्यापक धनंजय नागमवाढ यांच्यासह इतर मान्यवर दिसत आहे.
close