shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निमगाव (ह) येथे दिग्विजय बागल व ज्येष्ठ नागरिक भानुदास भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ६/ करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील रोकडे वस्ती, भोसले वस्ती येथे सिंगल फेज वीज पुरवठा सुरू व्हावा यासाठी ७.५० लाख रुपये व निमगाव हवेली येथील ग्रा. मा. क्र. २३८ लक्ष्मण नीळ सर घर ते टकले / जगदाळे वस्ती या रस्त्यांचे येथील खडीकरण करणे या साठी ४.०० लाख रुपये व भारत जगताप व पोपट जगताप वस्तीवर सौर पथ दिवे या सर्वच विकास कामांसाठी एकूण निधी  रक्कम ₹ ११.७० लाख रुपये निधी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, युवा नेते दिग्विजय बागल यांनी मंजूर केला आहे. या सर्वच विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते दिग्विजय बागल व ज्येष्ठ नागरिक भानुदास भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. मकाई सह साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, आदिनाथ सह साखर कारखाना माजी संचालक नामदेव भोगे, श्री. मकाई चे संचालक राजेंद्र मोहोळकर, संचालक पै. अनिल शिंदे, अशोक पाटील, माजी सरपंच धर्मराज जगताप, माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, सोसायटी चेअरमन अतुल नीळ, संचालक विठ्ठल लोहार, माजी सदस्य दादा पाटील, ग्रा. सदस्य भारत जगताप, सोसायटी संचालक राजेंद्र भोसले, भीमराव रोकडे, माधव इंगळे, गाहिनीनाथ रोकडे, आंबृषी भील, दत्ता मामा साळुंखे, दत्ता रोकडे, राजेंद्र ननवरे, हभप खंडू नीळ, माजी सदस्य जगन्नाथ ननवरे, सूर्यभान रोकडे, विठ्ठल रोकडे, राजेंद्र रोकडे, सुभाष भोसले, राजेंद्र भील, छगन शिंदे, सुदाम साळुंखे, सूरज चव्हाण, आदी जण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निमगाव हवेली येथील सर्वच ग्रामस्थ बागल कुठुंबाच्या पाठीशी गेल्या अनेक वर्षांपासून खंबीर साथ देत कायमच उभे राहिले आहेत व यापुढे हि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवून देणार.
             सतीश नीळ
संचालक श्री मकाई सह साखर कारखाना.
close