shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

करमाळा नगर परिषदेस ७ कोटी तर कुर्डूवाडी नगर परिषदेस ८ कोटी निधी मंजूर:- आ. संजयमामा शिंदे


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६/ करमाळा शहरातील सर्व समाज घटकांसह, सीसीटीव्ही बसविणे व इलेक्ट्रिक पंप बसविणे या कामांच्या मंजुरीमुळे करमाळा शहरवासीय समाधानी झाले आहेत. २०२४ निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदार संघात अंतर्भूत असलेल्या करमाळा व कुर्डूवाडी या २ नगरपरिषदेला १५ कोटी निधी मंजूर करून घेतला असून शासन निर्णय क्रमांक - संकीर्ण २०२४/प्र. क्र. ८७ (३५/का.१४११, दि.१४/१०/२०२४) नुसार करमाळा नगरपरिषद ता. करमाळा येथे चांदगुडे गल्ली परिसर रस्ता काँक्रीट करणे व गटार बांधणे - ५० लक्ष, दत्त मंदिर (विकास नगर) ते शासकीय विश्रामगृह (सात विहीर) रस्ता डांबरीकरण करणे -५० लक्ष, रंभापुरा गल्ली येथे अंतर्गत गटारी बांधणे- २५ लक्ष, रंभापुरा गल्ली करिता बोअर घेणे व पाण्याची टाकी बांधणे - २५ लक्ष, रंभापुरा गल्ली भुईकोट किल्ला शेजारील बाग सुधारणा करणे - १० लक्ष, घोलप हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाठीमागील बाजू पर्यंत रस्ता काँक्रीट करणे - ३५ लक्ष, भवानी पेठ मारुती मंदिर बाजू ते डॉ. लावंड हॉस्पिटल जवळील पुलापर्यंत रस्ता कांक्रीट करणे - १० लक्ष,
करमाळा शहरातमध्ये सी. सी. टिव्ही कॅमेरे बसविणे - ३० लक्ष, गणेश नगर आनंद बाग मुस्लिम स्मशानभूमी (कब्रस्तान) येथे सुशोभिकरण करणे, पाणीपुरवठा सोय करणे - १० लक्ष, शिंपी समाजासाठी सभागृह  बांधणे - २५ लक्ष, ईदगाह मैदानवर फरसी बांधणे व सुशोभिकरण करणे - १० लक्ष, गवंडी गल्ली येथे समाज मंदिर बांधणे - १० लक्ष, रमेश कांबळे घर ते घोडके घर गटार बांधकाम करणे - १० लक्ष, देविदास कांबळे घर ते नगरपरिषद नाला येथे गटार काम करणे - १० लक्ष, प्रशांत कांबळे घर ते अविनाश कांबळे घरापासून पुढे सुहास कांबळे घर येथे गटार काम करणे - १५ लक्ष, सिद्धार्थ भोसले घर ते दशरथ बाबुराव कांबळे घर गटार बांधणे - १५ लक्ष, सिध्दार्थ भोसले घर ते मधुकर थोरात घर रस्ता काँक्रीट करने - १५ लक्ष, सिध्दार्थनगर येथील अंगणवाडी क्र. २ ते जीवन कांबळे घर गटार काम करणे - १० लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कोपरा ते बाळासाहेब कांबळे घर रस्ता काँक्रीट करणे - १० लक्ष, रहिष कांबळे घर ते नाला गटार काम करणे - १० लक्ष, शितोळे घर ते गणपती मंदिर रस्ता गटार करणे - १० लक्ष, वाचनालयासमोर सांस्कृतिक भवन बांधणे - १५ लक्ष, संताजीनगर प्लॉटिंगमधील नगरपालिका खुल्या जागेत बगीचा विकसित करणे - १० लक्ष, संताजीनगर मधील अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे - २० लक्ष, संत सेना महाराज सांस्कृतिक भवन बांधणे - २० लक्ष, मंगळवार पेठ काझीबोळ ते बारामती सहकारी बैंक बोळ रस्ता काँक्रीट करणे गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे - १५ लक्ष, करमाळा शहरास पाणी पुरवठा करणेसाठी दोन इलेक्ट्रीक मोटर (पंप) बसविणे - १ कोटी ४० लक्ष, सटवाई मंदिर पुल ते जामखेड रोड पुल (गोरख पवार यांचे दुकानापर्यंत) नाला ट्रेचिंग करणे - ५०  लक्ष, कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळा नवीन वर्गखोली बांधणे - ३५ लक्ष याप्रमाणे करमाळा नगरपरिषदेसाठी ७ कोटी निधी प्राप्त झाला आहे.

कुडूवाडी नगरपरिषद ता. माढा यांच्यासाठी ८ कोटी निधी प्राप्त असून त्यामधून टेंभुर्णी रोड येथील बेंद ओढ्यावर पुल बांधणे - २ कोटी, रेल्वे गेट ते करमाळा रोड चौक रस्ता करणे - १ कोटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर सुशोभिकरण करणे - १ कोटी, कुडूवाडी शहर अंतर्गत रस्ते तयार करणे - २ कोटी ५० लक्ष, माढा रोड वरील घाण पाण्यावरील पुल बांधणे - ५० लक्ष, कुडूवाडी नगरपालिका अग्निशामक दल संरक्षक भिंत बांधणे - ६० लक्ष, नेहरुनगर येथे गटार बांधकाम करणे - ४० लक्ष असा एकूण ८ कोटी निधी कुर्डूवाडी नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीचा प्रत्यय आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यातून दिसून येतो. करमाळा नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ. शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ २ नवीन इलेक्ट्रिक पंप खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर करमाळा शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविणे ही मागणी त्यांच्याकडे आली असता त्यासाठीही त्यांनी नगर विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला आहे.

प्रवीण जाधव:- नगरसेवक करमाळा.
close