shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आरोग्यदुत नवदुर्गांच्या उपस्थितीत पारनेरला रास दांडिया संपन्न ...

प्रतिनिधी : संजय वायकर

पारनेर : पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व झेंडे हॉस्पिटल (झेंडे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर)यांच्या संयुक्त विद्यमाने मनकर्णीका लॉन,पारनेर येथे दि . ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी महिला डॉक्टरांसाठी रास-दांडिया कार्यक्रम आयोजित केला मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

कार्यक्रमासाठी असोसिएशनच्या चारही झोन मधील महिला व  पुरुष डॉक्टर्स त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते . सर्व सहभागी सदस्यांनी सुंदर समूहनृत्य सादर केले .तसेच लहानगे ही सहभागी झाले होते .

  कार्यक्रमासाठी डॉ.श्री प्रशांत झेंडे व डॉ.श्री.प्रथमेश झेंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते .डॉ.प्रशांत झेंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . झेंडे हॉस्पिटल मधे नव्याने सुरू केलेल्या सुविधांबद्दल माहिती दिली . तसेच संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक करत वर्किंग कमिटीच्या कामाबद्दल शाबासकी दिली .संघटनेच्या ऐक्याबद्दल समाधान व्यक्त केले.डॉ.झेंडे यांच्या हस्ते सहभागी महिला सदस्यांना भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्री. भाऊसाहेब खिलारी,उपाध्यक्ष डॉ.श्री.सोमैश्वर आढाव, सेक्रेटरी डॉ.श्री.संदीप तांबे, खजिनदार डॉ.श्री.जितेंद्र खामकर,वर्किंग कमिटी पदाधिकारी डॉ.श्री.संदीप औटी, डॉ.सौ.तनुजा रोहोकले, डॉ.सौ.पद्मजा पठारे, डॉ.सौ. शोभा गायखे, डॉ.सौ.नीता अडसूळ,डॉ.श्री.सुनील कदम, डॉ.श्री.पांडुरंग थोरात,डॉ. श्री. अजित लंके, डॉ.श्री.संजय बांडे,डॉ.श्री.नितीन रांधवन, डॉ.श्री.सुशील पादीर व डॉ.श्री.विनायक सोबले यांच्यासह तालुक्यातील इतर वैद्यक व्यावसायिक यांनी परिश्रम घेतले.

संघटनेचे अध्यक्ष डॉ.खिलारी यांनी सदस्यांसाठी असेच उत्तरोत्तर करमणुकीचे व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा मानस यावेळी व्यक्त केला.उपाध्यक्ष डॉ.श्री.सोमेश्वर आढाव यांनी सर्वांचे आभार मानले .संघटनेचे सेक्रेटरी डॉ.श्री.संदीप तांबे यांनी सुंदररित्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
close