shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बांडेवाडी शाळेत वाचन प्रेरणा दिन व विदयार्थी दिन विविध उपक्रमांनी साजरा.**सलग वाचन करत मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना वाहिली आदरांजली.*

*बांडेवाडी शाळेत वाचन प्रेरणा दिन व विदयार्थी दिन विविध उपक्रमांनी साजरा.*
*सलग वाचन करत मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना वाहिली आदरांजली.*
इंदापूर: दि१५ ऑक्टो भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षिका कांचन रणपिसे यांनी वाचनाचे महत्त्व, फायदे,प्रकार याबाबत माहिती दिली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्मार्ट टिव्ही वर  कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.मुलांनी गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन केले.वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी हा उद्देश आहे असे मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी सांगितले.
            वाचन प्रेरणा दिनाबरोबरच जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यातआला . संतोष हेगडे यांनी यांनी मुलांना हात धुण्याच्या 10 पायऱ्या सांगितल्या. हात धुण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. हात धुण्याचे महत्व व  उपयोग सांगितले. दोन्ही उपक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले.
close