shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नमो संस्थेच्या वतीने ऐतवरनाथ गड येथे वृक्षारोपण संपन्न ...


प्रतिनिधी : पौर्णिमा कोमाकूल

अहिल्यानगर :  भिंगार भागातील चांदबिबी महाल येथील ऐतवरनाथ बाबा मठ येथे नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी आंबा , वड आणि इतर झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण डॉ . अनिल करांडे , धीरज लांडगे, मंगेश केवळ , महेश केवळ , पत्रकार डॉ . संजय वायकर यांच्या हस्ते करण्यात आले .

वृक्षारोपण ही काळाची गरज असुन नागरिकांनी त्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे . विविध वृक्षांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी धीरज लांडगे यांनी केले . पुढील काळात साधारण दहा हजार वृक्ष लावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला .

नमो संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने संस्थेचे आभार व्यक्त केले .
close