shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ दिनेश घोलप यांच्या उपोषणास माजी आ . नारायण पाटील यांचा पाठिंबा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३ / मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण भूमिकेस वंदेमातरम शक्तीसेनेचे राज्य समन्वयक दिनेश घोलप यांचे करमाळा तहसील कार्यालय येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संपन्न झाले. यावेळी उपोषणास पाठिंब्याबद्दल करमाळा विधानसभेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी उपस्थिती दर्शवून पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, राष्ट्रवादीचे अजित (पवार गट) भरत अवताडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वंदेमातरम शक्तीसेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा प्रज्ञासेल सुहास घोलप, माजी पंचायत समिती सदस्य राहुल सावंत, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप, भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्र ठाकूर, लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे सहकारी अमरजीत साळुंके, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य नागेश माने, रामवाडी चे लोकनियुक्त सरपंच गौरव झांजुर्णे, नगरसेवक संजय सावंत, जगताप गटाचे केम येथील सागर दौंड, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, भीम दलाचे सुनील भोसले, युवा सेना (उद्धव ठाकरे) गट तालुकाप्रमुख समाधान फरतडे, वंचित चे यशपाल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य पोथरे येथील संतोष ठोंबरे, उद्योजक गोरख भांड, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना नेते कुणाल पाटील, युवा सेना जिल्हा उपप्रमुख श्रीकांत गोसावी, ग्रामपंचायत सदस्य वरकुटे येथील दादा तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण, राष्ट्रवादीचे हनुमंत मांढरे, पत्रकार सुर्यकांत होनप, पत्रकार विशाल परदेशी, पत्रकार अलीम शेख, पत्रकार जयंत दळवी, नितीन घोडेगावकर, सामाजिक कार्यकर्ते दादा इंदुलकर, संतोष साप्ते, जितेंद्र चांदगुडे, विजय भांडवलकर, गुलाम सय्यद, गणेश घोलप, राहुल निकम, संतोष देवकर, गणेश फरतडे, दिलीप चव्हाण, शिवाजी नाईकनवरे, विशाल फरतडे, अ़ॅड. अमर शिंगाडे, अ़ॅड. विनोद चौधरी, उद्योजक प्रफुल्ल शिंदे, निलेश चव्हाण, वरकटनेचे सरपंच गणेश घोरपडे, प्रसाद जगताप, नामदेव कांबळे, आदींनी समर्थनार्थ स्वाक्षऱ्या केल्या.

उपोषणाच्या समारोप वेळी करमाळा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे यांनी उपोषणास उत्तर देताना आपण निवेदनात दिलेल्या सर्व मागण्या वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येतील असे आश्वासन देऊन लाक्षणिक उपोषण स्थगित करावे अशी विनंती पत्राद्वारे केली. त्यांच्या विनंतीस मान देऊन उपोषण करते वंदेमातरम शक्तीसेनेचे राज्य समन्वयक दिनेश घोलप यांनी आपले उपोषण स्थगित करून मागणी मान्य न झाल्यास भविष्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

सदर उपोषणास करमाळा तालुक्यातील तथाकथिक मराठा समाजाचे कैवारी व आपणच मराठा समाजाचे करते आहोत असे समजणारे सर्व तथाकथित व्यक्तींनी उपोषणास पाठ फिरवलेली दिसून आली. यातूनच स्पष्ट होते की यांना खरोखरच मराठा समाजाचा कळवळा आहे? की मराठा समाजाचा वापर करून आपली राजकीय व सामाजिक पोळी भाजण्याचा कार्यक्रम? ही मंडळी करीत आहेत अशी चर्चा करमाळा तालुक्यातून उपोषणाच्या निमित्ताने होत आहे.
close