प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: करमाळा तालुक्यातील पोररे येथे आ. संजय मामा शिंदे यांची सभा चालू असताना पावसाच्या सरी सुरू झाल्या तरी देखील संजय मामा शिंदे यांनी पाऊस चालू असताना सभा पूर्ण केली. आ. संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दौरा सुरु आहे. आज (बुधवार) पांडे, मांगी, वडगाव उत्तर, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, बिटरगाव (श्री), कामोणे येथे कॉर्नर बैठका झाल्या. त्यानंतर सायंकाळी पोथरे येथे सभा होती मात्र सभा सुरु असताना पावसाच्या सरी कोसळल्या. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिंदे यांचा सुरु असलेल्या करमाळा तालुक्यातील दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. या दौऱ्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. ठिकठिकाणी वाजतगाजत स्वागत होत आहे. पोथरे येथे सायंकाळी ७ वाजता आमदार शिंदे यांची सभा होती मात्र सभा सुरु होताच पाऊस सुरु झाला. या पावसात नागरिक तसेच उभा होते. त्यांना आमदार शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
आपण फक्त विकास कामांवरच निवडणूक रिंगणात उतरलो आहे. यापुढेही विकास कामे करायची आहेत. या भागाला कायमस्वरूपी सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून कुकडी उजनी योजना करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यांच्या सर्व्हेक्षणासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. काम करत असताना मी माझा व विरोधातला असा कधीही भेदभाव केला नाही. आलेल्या प्रत्येकाचे काम करण्यावर माझा भर आहे असे यावेळी आमदार शिंदे म्हणाले.