shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची डिवाइन आयुर्वेदा व रेणुका हर्बल आयुर्वेदिक कंपनीला भेट

अशोकनगर / प्रतिनिधी: माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील व अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली अशोकनगर येथील अशोक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डिवाईन आयुर्वेदा व रेणुका हर्बल इंडस्ट्री श्रीरामपूर या आयुर्वेदिक कंपनीला नुकतीच भेट दिली.

औषध निर्माणशास्त्रातील प्रात्यक्षिके व औद्योगिक क्षेत्र भेटी हा मूलभूत पाया ओळखून विद्यार्थ्यांसाठी कंपनीच्या अंतर्गत चालणाऱ्या सर्व विभागाची परिपूर्ण माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. यामध्ये कंपनीतील विविध यंत्रणे, उपकरणे वापरणे तसेच औषधे कशी तयार होतात व डिजिटल मार्केटिंग नोकरी विषयक संधी व कंपनीतील अनेक पैलूवर परिपूर्ण माहिती दिली. सर्व औषधांचे प्रोडक्शन, पॅकेजिंग, स्टोरेज, क्वालिटी (गुणवत्ता) हे सर्व विभाग बघून व समजावून घेऊन  विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. अशोक फार्मसी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान व उपक्रमांवर तसेच औद्योगिक क्षेत्र भेटी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील नवीन घडामोडी व औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन संधींना सामोरे जाण्यास कायम अग्रेसर असते.

सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद कोते, किरण थोरात, चैतन्य घोलप, सबा शेख व वैशाली सुकेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close