shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकनेते बलभीमराव पाटील कला क्रीडा व सांस्कृतिक शिक्षण मंडळ संचलित भाई भाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत मारली बाजी.*

*लोकनेते बलभीमराव पाटील कला क्रीडा व सांस्कृतिक शिक्षण मंडळ संचलित भाई भाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत मारली बाजी.*
*आप्पासाहेब यमपुरे* 
टेंभुर्णी (चांदज) दि.२ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहमदनगर येथे झालेल्या विभागीय स्तरावर कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्षीय  वयोगटांमध्ये 74 किलो वजनी गटात लोकनेते बलभीमराव पाटील कला,क्रीडा व सांस्कृतिक शिक्षण मंडळ संचलित, भाई भाई विद्यालय चांदज मधील कु.शुभम झींजे याने प्रथम क्रमांक मिळवला अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश कोकाटे यांनी दिली. 
        
         शुभम झींजे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हनुमंत पाटील जिल्हा परिषद सदस्य अंजनादेवी शिवाजीराव पाटील युवा नेते कुलदीप पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश कोकाटे लोकरे सर,पाटील सर,जगदाळे सर यांनी अभिनंदन व कौतुक केले. क्रीडा शिक्षक दुर्योधन साठे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
        
        शुभम झींजे यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा विविध खेळांमध्ये प्राविण्य दाखवताना दिसून येतात.विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या भावी जीवनामध्ये स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वैयक्तिक किंवा सांघिक खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. शरीर तंदुरुस्त असेल तर अभ्यासात एकाग्रता सुद्धा वाढेल असे ते म्हणाले.

         त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हनुमंत पाटील संस्थेचे सर्व विश्वस्त मुख्याध्यापक गणेश कोकाटे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक केले. व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
close