अजिजभाई शेख / राहाता:
राहाता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी केंद्र बाभळेश्वर येथील विद्यार्थ्यांनी २०२४ - २५ नुकत्याच पुणे येथे झालेल्या विज्ञान नाट्य उत्सव विभागीय स्तर यामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी सादरीकरण व प्रात्यक्षिके सादर करण्यात आले, यामध्ये कु.प्रणिता कदम व सर्व विद्यार्थिनी यांनी विशेष प्रकारे सादरीकरण करत भविष्यात येणारे जलसंकट यावर जागतिक स्तरावर नाटिका सादर करून उपस्थित सर्व अभ्यासक यांनाही जल संकटाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी पुणे येथील दापोडी गणेशनगर येथे झालेल्या स्पर्धेत नाट्य कलाकारांचे प्रात्यक्षिके पाहून तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. सदर स्पर्धकांना श्री कडूस साहेब, शिक्षणाधिकारी जि.प. अहमदनगर, श्री. कवळे साहेब शिक्षणाधिकारी अहमदनगर पंचायत समिती, श्री. पावसे साहेब, शिक्षण अधिकारी राहाता पंचायत समिती,श्री. कांबळे साहेब, बीट बाभळेश्वर शिक्षण विस्तार अधिकारी. श्री.असे साहेब केंद्रप्रमुख बाभळेश्वर, प्राचार्य श्री.शेख सर, पर्यवेक्षक श्री.भांगरे सर, विज्ञान शिक्षक श्री. सुनील आढाव सर. श्रीमती पल्लवी कोकणे मॅडम. वैशाली रोकडे मॅडम. श्रीमती धूळसैंदर मॅडम आदिंनी सदर विद्यार्थिनी यांचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११