shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डब्ल्यूटीसी गुणतालिकेत द.आफ्रिकेने चौथे स्थान गाठले

      दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील  पहिला सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला.  या सामन्यात पाहुण्यांचा ७ गडी राखून पराभव करून दक्षिण आफ्रिकेने केवळ मालिकेत १-० अशी आघाडीच घेतली नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही झेप घेतली.  या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता, तर बांगलादेश सातव्या स्थानावर होता.  मात्र ढाका कसोटी संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दोन स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  तर बांगलादेश सातव्या स्थानावर घसरला आहे.

                दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे न्युझिलंड आणि इंग्लंडने प्रत्येकी एक स्थान गमावले आहे.  भारताविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्यानंतर किवी संघ चौथ्या स्थानावर पोहोचला होता, मात्र आता ताज्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंड सध्या पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर इंग्लंड पाचव्या स्थानावर होता, मात्र आता तो सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.  तर पाकिस्तान आठव्या स्थानावर कायम आहे.
                टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, न्युझिलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत पराभव होऊनही रोहित शर्मा आणि कंपनी पहिल्या स्थानावर कायम आहे.  भारताची विजयाची टक्केवारी ६८.०६ आहे.  भारतासोबतच ऑस्ट्रेलिया टॉप-२ मध्ये आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ६२.५० अशी आहे.
               बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे.  या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने बांगलादेशचा धुव्वा उडवला. कागिसो रबाडाने दुसऱ्या डावात सहा बळी घेत बांगलादेशचे कंबरडे मोडण्याचे काम केले.  हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १०६ धावा धावांचे टार्गेट मिळाले.  दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ ३०७ धावांत गडगडला. रबाडाने दोन्ही डावात एकूण ९ विकेट घेतल्या.
                 बांगलादेश संघाचा कर्णधार नझमुल शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.  मात्र, बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवरच आटोपला.  दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.  तर बांगलादेशकडून पहिल्या डावात महमुदुल हसन जॉयने सर्वाधिक ३० धावा केल्या.  यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला.  त्यांच्याही सहा विकेटसह १०८ धावांवर पडल्या, पण काइल वेरेनीने ११४ धावांची खेळी करत संघाला बळ दिले.  वियान मुल्डरने ५४ धावा केल्या.
                अशा प्रकारे संघाने पहिल्या डावात ३०८ धावा केल्या.  बांगलादेशकडून तैजुल इस्लामने पाच बळी घेतले, तर हसन महमूदने तीन आणि मेहदी हसन मिराजने दोन बळी घेतले. बांगलादेशचा संघ २०२ धावांनी पिछाडीवर होता.  अशा परिस्थितीत बांगलादेशने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ३०८  धावा केल्या.  त्यामुळे बांगलादेशला केवळ १०५ धावांची आघाडी मिळाली.  बांगलादेशकडून एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही.  मेहदी हसन मिराजचे शतक तीन धावांनी हुकले.  जाकर अलीने ५८ धावा केल्या.  त्याचवेळी रबाडाने सहा बळी मिळविले.  दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १०६ धावा करायच्या होत्या. जे त्यांनी केवळ २२ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले मालिकेतील दुसरा सामना २९ ऑक्टोबरपासून चितगाव येथे खेळवला जाणार आहे.
                 डब्ल्यूटीसीचे विद्यमान सत्र सध्या अंतिम टप्प्यात आले असून प्रत्येक संघ फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जिवाच्या आकांताने लढत आहेत. तिचे चार संघ वेस्ट इंडिज, पाकिस्तान, बांगलादेश व न्युझिलंड यांचे आव्हान संपल्यासारखेच आहे. मात्र वरच्या पाच संघात अंतिम फेरी गाठण्याची चुरस वाढली आहे.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close