श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत राज्यातील दुसरी ट्रेन पुणे येथून दिनांक १० ऑक्टोबर रोजी ८०० पुणे जिल्हा परिसरातील लाभार्थ्यांना घेऊन दसऱ्याच्या दिवशी राममंदिर दर्शन होणार आहे.हा एक आनंदाचा क्षण वयोवृद्ध नागरिकांना लाभणार आहे. या आधी राज्यातील पहिली ट्रेन दिनांक २७ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथून रवाना झाली होती.महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबवीत आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासन. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, रेल्वे विभाग मुंबई.प्रादेशिक उपायुक्त, सहा.आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे,व नोडल अधिकारी तसेच पुणे येथील सहकारी संयोजक यांना ज्येष्ठ नागरिकांकडून धन्यवाद दिले जात आहेत.
पुणे येथून १० ऑक्टोबर रोजी पुणे येथून अयोध्या राम मंदिर दर्शनासाठी ही विशेष ट्रेन दुपारी १३.३० वा. निघणार असून अयोध्याधाम जंक्शन येथे पोहोचेल व दिनांक १४ ऑक्टोबरपर्यंत परतीचा प्रवास राहील. लाभार्थी यादी जिल्हाधिकारी पुणे,व सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग येथे उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक लाभार्थी यांना कळविण्यात येईल असे पुणे येथील संयोजकांनी सांगितले. याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील, परिसरातील लाभार्थी यांचेसाठी तिसरी ट्रेन घ्यावी व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाचा नागरिकांना लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर [अहिल्यानगर] व संबधित अधिकारी, पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे यांनी केली आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११