shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सहकारमहर्षी स्व. सुवालाल गुंदेचां यांचे बँकिंग क्षेत्रासाठीचे योगदान दिशादर्शक - किरण काळे


स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्यावतीने अभिवादन 

प्रतिनिधी :  संजय वायकर

 सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा हे तपस्वी होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान सहकारासाठी आदर्शवत आणि दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमांमध्ये काळे बोलत होते. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा सचिव किशोर कोतकर, काँग्रेस सामाजिक न्याय युवा आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, क्रीडा व युवक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट युवक काँग्रेस उपाध्यक्ष आनंद जवंजाळ आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

काळे म्हणाले की, सुवालालजींनी बँकिंग क्षेत्रामध्ये कायम चांगल्या लोकांना संधी देण्याचे काम केलं. बँकेचा कारभार आदर्शवत चालवला. आज ते हयात नाहीत. मात्र त्यांचे विचार जिवंत आहेत. त्यांचे चिरंजीव मनोज गुंदेचा हे त्यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत.  सुवालालजीं प्रमाणेच प्रामाणिकपणा, निष्ठा, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यामध्ये तळमळ आहे. जैन समाजाला काँग्रेस पक्षाने कायमच सामावून घेतले आहे. मनोज गुंदेचा आज जैन समाजाच प्रतिनिधित्व काँग्रेसमध्ये समर्थपणे करत आहेत. 

यावेळी मनोज गुंदेचा म्हणाले की, माझ्या वडिलांची काँग्रेस पक्षावर निस्सीम श्रद्धा होती. त्यांनी प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली. सहकार आणि बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केलेले मापदंड आजच्या पिढीसाठी दिशा देणारे आहेत. बँकिंग क्षेत्र सातत्यपूर्ण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यामध्ये अग्रेसर राहायचे असेल तर व्यवहारांमध्ये शतप्रतिशत पारदर्शकता असायला हवी हा त्यांचा आग्रह आज आम्हाला सहकारामध्ये काम करत असताना अडचणीच्या परिस्थितीमध्ये सातत्याने दिशा देत असतो.
close