shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हा नियोजन मंडळातून माढा तालुक्यातील तलावांना पाणी देण्यासाठी १ कोटी ७६ लक्ष निधी मंजूर:- आ. संजयमामा शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६/ करमाळा - माढा मतदारसंघातील माढा तालुक्यातील सिना - माढा उपसा सिंचन योजना सध्या कार्यान्वित आहे. या योजनेवरील असणाऱ्या गावांमध्ये ४ पाझर तलाव आहेत. सदर तलाव सिना माढा उपसा सिंचन योजनेवरुन भरुन देणेसाठी कालवा ते पाझर तलाव तसेच PDN (बंद नलिका प्रणाली) ते पाझर तलाव ही कामे करणेसाठी ४ पाईपलाईन करणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ मधून १ कोटी ७६ लक्ष निधी मंजूर झाला आहे. 

या निधीमधून सिना माढा उपसा सिंचन योजनेतील पाण्याने भोसरे  येथील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्थेमधून चव्हाण वस्ती ते बंद ओढयास पाणी सोडणे, घाटणे येथील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्थेमधून बागल शेत ते ओढ्यास पाणी सोडणे, घाटणे येथील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्थेमधून उमेश कदम शेत ते ओढ्यास पाणी सोडणे, वडाचीवाडी ता. माढा येथील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या उजवा कालव्याच्या वितरण व्यवस्थेमधून पाझर तलाव भरणे, शिंदेवाडी येथील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या उजवा कालव्याच्या वितरण व्यवस्थेमधून पाझर तलाव भरणे आदी कामे केली जाणार आहेत.

या कामामुळे भोसरे, घाटणे, वडाचीवाडी व शिंदेवाडी येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
close