shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

केज तालुक्यातील मुलांनी क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक करावा...आ.नमिता मुंदडा!!


   प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
::::::::::::::::::::::::::::::::::
          आज दि:8/10/24 मंगळवार रोजी पिसेगाव येथे तालुका क्रीडा संकुल चे उद्घाटन आ. नामिताताई मुंदडा यांचे हस्ते करण्यात आले .या वेळी कार्यक्रमास केज चे तहसीलदार श्री राकेश गिड्डे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री चव्हाण साहेब ,जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा(काकाजी) उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर,भाजपा अध्यक्ष भगवान केदार ,जेष्ठ नेते सुनील गलांडे,नेताजी शिंदे, राहुल गदळे, महादेव सूर्यवंशी, विनोद गुंड,अशोक नेहरकर,बाळासाहेब नेहरकर ,महेंद्र चाटे, व गावकरी उपस्थित होते. 


या वेळी आ नामिताताई म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून त्यांचं करियर घडवण्यासाठी या क्रीडा संकुलाचा नक्कीच फायदा होईल या ठिकाणी,क्रिकेट,हॉलिबाल,टेनिस,कुस्ती,खो-खो,कब्बडी ,स्वीमिंग, रानींग ट्राक,या सर्व खेळांचे अद्यावत असे ग्राऊंड इथे करण्यात येणार आहेत. या वेळी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले की मुलांनी मोबाईल मधील खेळांपेक्षा मैदानी खेळ खेळावेत व आपलं आरोग्य सुधारावे,तसेच केज तहसिल श्री राकेश गिड्डे यांनी सांगितले की क्रीडा संकुल करताना ज्या लोकांची घरे अतिक्रमनात जातील त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री चव्हाण साहेब यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात नसेल असे अद्यावत क्रीडा संकुल या ठिकाणी होईल. 


या पर्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ .वासुदेव नेहरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री महादेव सूर्यवंशी यांनी मानले .या वेळी कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close