shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अनंतराव पवार विद्यालयात सखी सावित्री मंच द्वारे विद्यार्थिनींना व माता पालकांना करण्यात आले मार्गदर्शन.


अनंतराव पवार विद्यालयात सखी सावित्री मंच द्वारे विद्यार्थिनींना व माता पालकांना करण्यात आले मार्गदर्शन.
 निर निमगाव : विद्यार्थिनींनी हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहण्यासाठी  फळे, कंदमुळे, योग्य असा आहार वेळेवर घेतला पाहिजे. हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असल्यास चेहरा तेजस्वी राहतो. मेंदू तल्लक राहतो. तसेच प्रत्येक विद्यार्थिनींनी आपल्या शरीराची स्वच्छता राखली पाहिजे असे प्रतिपादन  आरोग्यवर्धिनी उपकेंद्र निरनिमगावच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा सस्ते  यांनी अनंतराव पवार विद्यालय निर- निमगाव येथे सखी सावित्री मंचच्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
शाळा मधील मुला मुलींच्या सुरक्षतेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी शालेय स्तरावर सखी सावित्री मंचाची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून निर- निमगाव (ता. इंदापूर) येथील अनंतराव पवार विद्यालयमध्ये मंगळवार (दि. १५ ऑक्टो) रोजी विद्यालयातील  इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थिनी व त्यांच्या माता पालक भगिनींचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये  ४० माता पालक  तर  ६० विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. 
 याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. सुमित्रा कोकाटे , सहशिक्षिका विद्याभूषण मकर , आहिल्या घोगरे ,यांनी विद्यार्थिनींना व माता पालकांना आपले आरोग्य आहार आणि किशोरवयीन मुलींच्या समस्या यावर मार्गदर्शन केले.

अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त शोभाताई घोगरे यांनी उपस्थित माता पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून माता पालकांचे आभार मानले.यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे यांच्यासह सहशिक्षक अण्णासाहेब गोरे उपस्थित होते.
---------------------------------
चौकट: 
  विद्यार्थिनींनी स्वच्छतेवरती लक्ष दिले पाहिजे तसेच आहारामध्ये पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, डबा भरून आणलेले जेवण  पोट भरून खाल्ला पाहिजे तसेच व्यायाम केला पाहिजे- मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे 
-----------------------------------
close