प्रतिनिधी : आसावरी वायकर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नगरकरांसाठी दहशतमुक्त, सुसंस्कृत, शांत, ताबेमारीमुक्त, विकसित शहर निर्माण करण्यासाठी मी आणि शहर काँग्रेस गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गावर अविरतपणे चालत राहणार, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते.
किरण काळे म्हणाले की, आज मी आणि नगर शहरातील काँग्रेस ही असत्यातून जन्म घेतलेले खोटे-नाटे गुन्हे दाखल होणे, खोट्या नोटिसा, खोटे खटले अशा अग्निदिव्यातून जात आहे. शहरातील अपप्रवृत्तींना आम्ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालतो हा गुन्हा वाटत आहे. परंतु त्यांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गाची ताकद माहित नाही. गांधीजींच्या या मार्गा मुळेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले. हा मार्ग नगर शहरात दहशतमुक्त व विकसित शहर निश्चितच करू शकतो असा माझा आणि काँग्रेसचा दृढ विश्वास आहे.
काळे यांनी यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले की, तुम्ही ज्या संयमाने आज नगरकरांसाठी लढत आहात ही काँग्रेसची आणि महात्मा गांधींची आपल्याला शिकवण आहे. दडपशाही, द्वेष, मत्सर, मनगटशाही याच्या जोरावर ज्यांनी-ज्यांनी जनतेवर राज्य करण्याचा प्रयत्न केला त्यांचा शेवट हा नेहमी वाईट झाला आहे. प्रेम, आपुलकी, सद्भावना ही चिरंतन टिकणारी आहे. आपल्यावर अनेक वार, हल्ले होत राहतील. आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. मात्र आपण नगरकरांच्या हितासाठी सुरू केलेली लढाई ही सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने एक दिवस आपण आणि सर्व नगरकर नक्कीच जिंकू हे मी तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने सांगत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरण काळे म्हणाले.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला, काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, माजी नगरसेवक फैयाज केबलवाला, युवक काँग्रेसचे शम्स खान, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष आर.आर.पाटील, शहर जिल्हा सहसचिव राहुल सावंत, शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. अजित वाडेकर, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा खान, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, महिला काँग्रेस उपाध्यक्ष शैला लांडे, महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. जाहिदा शेख, महिला काँग्रेस सरचिटणीस मीनाज सय्यद, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, दिव्यांग काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुफियान रंगरेज, सामाजिक न्याय युवक आघाडी शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आनंद जवंजाळ, युवक काँग्रेस सरचिटणीस अशोक जावळे आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.