प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २९/ मकाई साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या एका बैठकीत त्यांनी अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश केला, ज्यात त्यांना ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळाले आहे. दिग्विजय बागल हे करमाळा तालुक्यातील प्रभावी युवा नेते असून, महायुतीच्या नेत्यांच्या जवळ राहिल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बागल यांचा जनसंपर्क मोठा आहे. तसेच मतदारांचा चांगला पाठिंबा मिळवत होते. बागल यांच्या शिंदे गटात प्रवेशामुळे करमाळा तालुक्यात आता शिवसेना शिंदे गट आणि
राष्ट्रवादी शरद पवार गट, अपक्ष उमेदवार आ. संजयमामा शिंदे यांच्यात थेट सामना होणार आहे. यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे बागल यांचे शिंदे गटात महत्त्व वाढणार असून एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता व त्यांनी आणलेल्या विविध योजनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना निवडणूकीत फायदा होणार असून त्यामुळे करमाळ्यात बागल यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
या प्रवशावेळी दिग्विजय बागल यांच्यासोबत मार्गदर्शक विलासराव घुमरे, मंगेश चिवटे, जिल्हा प्रमुख महेश चिवटे, मकाईचे मा. चेअरमन दिनेश भांडवलकर, सतीश नीळ, राजेंद्र मोहोळकर, नंदू भोसले इं. उपस्थित होते.