shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गौराईमळा शाळेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरी*

*गौराईमळा शाळेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन  म्हणुन साजरी*
 इंदापूर: जि. प. प्राथ. शाळा. गौराईमळा येथे आज दि. १५/१०/२०२४ रोजी भारतरत्न  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम इयत्ता ४ थीतील मुलांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन गुलाब पुष्प वाहण्यात आली.
          भारतरत्न डाॅ. कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा केला गेला .या मध्ये सर्व मुलांनी त्यांना जी पुस्तके वाचनासाठी आवडतात त्या पुस्तकांचे वाचन करुन  त्या पुस्तका बद्दल थोडी माहिती सांगितली.यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण होऊन आपल्या ज्ञानात  भर पडते याची जाणीव झाली .वाचनामुळे आपल्याला विविध प्रेरणादायक पुस्तकांची माहिती होते.
मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी मा. राष्ट्पती भारतरत्न यांनी डाॅ.कलाम यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरीमुळे देशाच्या प्रगतीत कसा फायदा झाला हे सांगितले .कलाम यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग मिळाला.
                   शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
close