प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
-----------------------------------
केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे ठासून सांगणाऱ्या केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी आपले शब्द खरे ठरवत मतदार संघातील जनतेची श्रद्धास्थाने असलेल्या देवस्थानांना आकरा कोटींचा निधी आणला व आजघडीला त्यातून मंदिरांचा होत असलेला विकास पाहून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
राज्यात दोन वर्षापूर्वी सत्ता बदल होऊन महायुतीची सत्ता आली अन केज मतदार विकासकामांची रेलचेल वाढली असे काहीसे चित्र मागील दोन वर्षात दिसून आले आहे. केज मतदार संघातील रस्ते , वीज , पाणी यासाठी मोठा विकासनिधी आणण्यात मोठे यश मिळवून सर्वांगीण विकासाचे बिरुद घेऊनच आपले कार्य चालू असल्याचे आ. नमिता मुंदडा यांनी दाखवून दिले .यावरतीच त्यांनी समाधान न मानता आपला मोर्चा मतदार संघातील हजारो लोकांची श्रद्धास्थाने असलेल्या विविध मठ व मंदिरांच्या विकासाकडे वळवला. वर्षभरात त्यांनी सोहळा देवस्थानांच्या विकासासाठी पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत आकरा कोटींच्या आसपासचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे .
यात प्रामुख्याने पर्यटन विकास निधी अंतर्गत नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थानसाठी 70 लाख रुपयांचा कीर्तन मंडप , विडा येथील शिवरामपुरी मठ संस्थान साठी 50 लक्ष रुपयांचा सभामंडप , वरपगाव येथील शिवरामपुरी मठसंस्थानसाठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांचा सभामंडप , आडस येथील आडकेश्वर महादेव मंदिरासाठी 25 लक्ष , आडस येथील हनुमान मंदिरासाठी 25 लक्ष , आवसगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष रुपये , युसुफवडगाव येथील श्रीराम मंदिरासाठी 50 लक्ष रुपये , वाघेबाभूळगाव येथील वाघेश्वरी देवी मंदिरासाठी 50 लक्ष रुपये , रामेश्वरवाडी
( हंगेवाडी ) येथील महादेव मंदिरासाठी 25 लक्ष रुपये , सासुरा येथील एकनाथ महाराज समाधी मंदिरासाठी 25 लक्ष रुपये , नंदुरघाट येथील तळ्याची आई देवस्थानसाठी 40 लक्ष रुपये , धनेगाव येथील मेसाईदेवी मंदिरासाठी 50 लक्ष , केज येथील भवानी आई मंदिरासाठी 25 लक्ष , केज येथीलच हजरत ख्वाजा महजबोद्दीन दर्गाहसाठी 25 लक्ष रुपये , दहिफळ वडमाऊली देवस्थानसाठी 50 लक्ष रुपये .
तर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत कुंबेफळ येथील सिद्धिविनायक मंदिरासाठी 2 कोटी रुपये , दहिफळ वडमाऊली येथील देवस्थानसाठी 2 कोटी रुपये असा निधी मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी मंजूर झाला होता.
यातून काही ठिकाणी सभामंडप , किचनशेड , पालखी हॉल , पेव्हर ब्लॉक , व सुशोभीकरण अशी विविध कामे होणार आहेत .यातील काही ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत तर काही लवकरच सुरु होणार आहेत . एकूणच आपली आस्था व श्रद्धा असलेल्या देवस्थानांचा विकास व कायापालट होणार असल्याने व मंदिर परिसरात निवाऱ्याची सोय होणार असल्यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.