shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्यामुळे गावाला भरीव निधी - शरद नवले


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
गेल्या २० वर्षात आला नाही इतका निधी महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने बेलापुर गावास मिळाला तसेच शेती महामंडळाच्या मोफत मिळालेल्या ४३ एकर जमिनीमुळे गोरगरीबांची घरकुले, घनकचरा प्रकल्प, क्रिडा संकुलासह विविध समाजाच्या स्मशानभुमीचे प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन माजी  जि प सदस्य शरद नवले यांनी केले.


     बेलापुर बु!! ग्रामपंचायतीच्या वतीने १५% मागासवर्गीय निधी व १० % महीला- बालकल्याण निधी मधुन मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल कुटुंबातील २०० विद्यार्थीनींना सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी श्री. नवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते, जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुवालाल लुंक्कड हे होते.
आपल्या भाषणात शरद नवले पुढे म्हणाले की, शासनाकडून मोफत मिळालेल्या ४३ एकर जमीनीमुळे  गावातील१२०० कुटुंबाचा घरकुलाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच दिव्यांग, विधवा, परित्यक्ता,  निराधार नागरीकांनाही सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील घनकचरा व सेंद्रिय खत प्रकल्प तसेच अनेक समस्या सूटणार आहेत.गावकरी मंडळाच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे होत असुन हि विकासकामे सहन होत नसल्यामुळे ज्यांना सत्तेवर असताना काही करता आले नाही असे निष्क्रिय लोक विनाकारण ग्रामपंचायतीची बदनामी करत आहे. माहीती अधिकाराचा दुरुपयोग करुन गावाच्या विकासकामांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही नवले यांनी केला.                        प्रास्ताविक भाषणात बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे तसेच माजी खा.डाॕ.सुजय विखे यांच्या सहकार्यामुळे कधी नव्हे ती भरीव विकासकामे होत आहेत. १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.ही विकासकामे देखवत नसल्यामुळे काही विघ्नसंतोषि विनाकारण उठाठेव करत आहेत. कन्या दिनाचे औचित्य साधून नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये शाळकरी मुलींना सायकल वाटप होत असल्याचा विशेष आनंद होत आहे असे .खंडागळे म्हणाले. यावेळी सरपंच स्वाती आमोलीक, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष  रणजीत श्रीगोड, पत्रकार देविदास देसाई, गावकरी पतसंस्थेचे संचालक मोहसीन सय्यद आदिनी मनोगत व्यक्त केले. सायकल वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य करणारे जे.टी. एस हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी, क्रीडाशिक्षक पोपटराव गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळूंके, खंडेलवाल सायकल मार्टचे गोपाल खंडेलवाल आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील सर्व शाळेतील २०० विद्यार्थींनीना सायकल वाटप करण्यात आले.कार्यक्रमास उपसरपंच तबस्सूम बागवान, माजी उपसरपंच मुस्ताक शेख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, प्रियंका कुऱ्हे, सुशिलाबाई पवार, मीना साळवी, उज्वला कुताळ, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर खंडागळे,विष्णुपंत डावरे, राज मोहम्मद शेख बाबूलाल पठाण, पोलीस पाटील अशोक प्रधान,तस्वर बागवान, गणेश बंगाळ, रावसाहेब अमोलिक,सुभाष अमोलिक,अन्नूभाई सय्यद,भैय्या शेख, दिलीप दायमा, दिपक क्षत्रिय,प्रसाद खरात,मास्तर हुडे, सुभाष आमोलीक दिलीप अमोलिक, माजी उपसरपंच अशोक गवते,रमेश शेलार, राजमोहम्मद शेख,रफिक शेख,रविंद्र कुताळ,राकेश कुंभकर्ण,प्रविण बाठीया, शहानवाज सय्यद,रविंद्र कोळपकर,गोरख कुताळ, जब्बार पठाण,राजेंद्र कुताळ, राजेंद्र काळे,किरण गागरे, मोहसीन सय्यद, गोपी दाणी, भाऊसाहेब तेलोरे,सुभाष शेलार,सोमनाथ जावरे, दिलीप दायमा प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, विशाल आंबेकर,बाळासाहेब शेलार, अल्ताफ शेख,विनायक जगताप,सुनिल भांड,सागर खरात,प्रभाकर ताके,सुधीर तेलोरे, सुलतान शेख, अली सय्यद,राज गुडे, अमिन सय्यद, फिरोज बागवान यांचेसह पालक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी निलेश लहारे यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close