shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूर येथे वृक्षारोपण महायज्ञ कार्यक्रम संपन्न.

इंदापूर येथे वृक्षारोपण महायज्ञ कार्यक्रम संपन्न.
'इंदापूर: 'महाराष्ट्र शासन - सामाजिक वनीकरण विभाग, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे अंतर्गत' राष्ट्रीय सरपंच संसद' आयोजित वृक्षारोपण महायज्ञ कार्यक्रमाद्वारे इंदापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यात ५००, ५०० असे मिळून १००० झाडे वाटप करण्यात येणार असून या निमित्ताने १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवकांना वृक्षारोपण संदर्भात माहिती व वृक्ष देण्यासंदर्भातील पत्र वितरण इंदापूर येथील हॉटेल स्वामीराज येथील सभागृहात देण्यात आले. 

या कार्यक्रमास राष्ट्रीय सरपंच संसदे' चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक, योगेश पाटील, उपाध्यक्ष व सहसमन्वयक प्रकाशराव महाले, इंदापूरचे नायब तहसीलदार विजय घुगे,महसूल सहाय्यक .राहुल पारेकर, वनाधिकारी  अर्चना कवितेके, पोलिस अधिकारी  माधुरी लडकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
 
या कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सरपंच संसदेचे इंदापूर तालुका समन्वयक महेंद्र रेडके , 
इंदापूर  तालुका महिला समन्वयक सौ.अनिताताई नानासाहेब खरात हे या कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक होते.तर इंदापूर राष्ट्रीय सरपंच संसदचे सदस्य  अतुल शिंगाडे,  शिवकुमार गुणवरे व सौ.अनिताताई ताटे यांचे या संयोजनासाठी त्यांना सहकार्य होते.
यावेळी इंदापूरचे नायब तहसीलदार  विजय घुगे, माधुरी लडकर, अर्चना कवितेके, प्रकाशराव महाले व  कार्यक्रमचे अध्यक्ष  योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले
यावेळी अमर जगदाळे, दीपिकाताई शिरसागर, गणेश लंबाते, भाग्यश्री बोडके, लक्ष्मण वाघमोडे, दिलीप पाटील, पोपट पवार, अमोलराजे इंगळे, महादेव पांढरे, दत्ता पांढरे, राजेश पवार, सद्दाम बागवान, मनीषा वाघ, शकुंतलाताई जगताप, माधुरी जगताप, संदीप रेडके, गणेश शिंगाडे, विशाल मेहेत्रे, अण्णा गायकवाड, सोनू सय्यद, गौरव राऊत, अरबाज बागवान, सोनाली बोडके, निर्मला जाधव, रेश्मा शेख ,नारायण हरणावळ, रुपेश वाघमोडे ,अभिजीत रेडके, व इतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सरपंच संसदेचे इंदापूर तालुक्याचे समन्वयक, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इंदापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूर तालुक्याचे राष्ट्रीय सरपंच संसदेचे सदस्य  नानासाहेब खरात यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते निलेशजी धापटे यांनी सुत्रसंचलन केले.
close