shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कर्मचाऱ्यांनी श्रद्धा ठेवून काम केले, तर जीवनात काहीच कमी पडत नाही : गोरक्ष गाडिलकर


साई संस्थान सोसायटीने सभासदांची दिवाळी गोड केली ! अठराशे कामगारांना किराणा व भेटवस्तूंचे केले वाटप

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

कोणत्याही तात्पुरत्या लोभाला कर्मचाऱ्यांनी बळी न पडता प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम केले तर जीवनात काहीच कमी पडत नाही असा विश्वास श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षकाडीकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान राज्यातील अग्रगण्य म्हणून नावा रूपास आलेल्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान कामगारांच्या पतपेढीतर्फे दीपावली निमित्ताने सभासदांना पन्नास किलो साखर पाच किलो गोडतेल, एक किलो फरसाण, एक किलो मिठाई, भिंतीवरील आकर्षक घड्याळ, त्याचप्रमाणे १५ टक्के डेव्हीडेंट व ठेवीवर नऊ टक्के व्याजाची रक्कम असे एकूण दोन कोटी रुपये कामगारांना देऊन कामगारांची दिवाळीपूर्वी दिवाळी गोड केली आहे. ह्या भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून सुमारे अठराशे सभासदांचा लाभ झाला आहे. यावेळी साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, महंत रामगिरी महाराज, महंत कशिकानंद महाराज यांच्या शुभहस्ते यासर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपट कोते आदिसह संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विठ्ठल पवार यांनी सांगितले कि कामगारांना काळ आणि वेळ बदलावी, शिस्त आणि याळेवर कामावर यावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून भिंतीवरील घड्याळ द्यायचे ठरले. साई संस्थान प्रशासनाच्या सहकार्यामुळेच आम्ही हे कार्य करू शकलो अशी भावना व्यक्त करत पवार यांनी व्यक्त केली. असून पतपेढीच्या माध्यमातून दर्जेदार वस्तू, पेढे, प्रसाद, बाटलीबंद पाणी, हे वाजवी दरात उपलब्ध करून भाविकांना सेवा देत आहेत. विशेष म्हणजे या पतपेढीची दीडशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आसून महाराष्ट्रात कामगारांची सर्वात अग्रगण्य असलेली एकमेव पतपेढी ठरली आहे. पतपेढीच्या माध्यमातून सुरू असलेली प्रसाद दुकाने यासह इतर ठिकाणीं सर्व स्टॉलवर भावफलक लावण्यात आले आहे. तसेच गूगल पे, फोन पे सुविधाही लवकरच कर्व्यानवित होणार असून भाविकांसाठी डिजिटल लॉकर सुरू करण्याचे कामही प्रगती पथावर असल्याची माहिती विठ्ठल पवार यांनी दिली.
या संस्थेचे नवीन संचालक मंडळ सत्तारूढ होऊन काही महिनेच झाले असून त्यांनी कामगारांच्या, सभासदांचा तसेच भाविकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय खूप यशस्वी ठरले असून गेल्या सहा महिन्यात या संस्थेने तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे मागील काही वर्षांच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट झाली आहे. विठ्ठल पवार व त्यांच्या सर्व संचालक मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबरोबरच कारभाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
close