प्रतिनिधी : संजय वायकर
अहिल्यानगर : समता प्रतिष्ठान, सोशल फाउंडेशन आयोजित "आदर्श माता द्वारकाबाई साळवे, "महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ "आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रमुख श्री .अमोल क्षीरसागर सर यांना दि .६ ऑक्टोबर २०२४ रोजी अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार श्री.संग्राम भैया जगताप साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. विजय साळवे सर आणि अध्यक्षा निशिगंधा साळवे मॅडम यांनी गेल्या कोरोना काळापासून समाजातील वंचित घटकासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तसेच सामाजिक ,अध्यात्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवणाऱ्या , व्यक्तींना जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून ३७ व्यक्तींची निवड करून ,मातोश्री" आदर्श माता द्वारकाबाई साळवे "महाराष्ट्र भूषण पुरस्कार शहराचे आमदार श्री. संग्राम भैय्या जगताप साहेब यांच्या हस्ते देण्यात आला .
याप्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब बोडखे सर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक श्री.आप्पासाहेब शिंदे ,जुनी पेन्शन योजनेचे प्रमुख कार्यवाहक श्री. महेंद्र हिंगे सर, केंद्रप्रमुख श्री. दत्तात्रय कडूस साहेब, मुख्याध्यापक श्री. रसाळ सर, प्राचार्य विलास साठे सर आदी मान्यवर उपस्थित होते .
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद शिंदे तसेच जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष महिला आघाडी प्रमुख अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख मुख्याध्यापक सेल यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले*तसेच आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.नरेंद्र फिरोदिया सर आणि संचालक मंडळांने अभिनंदन केले .