shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हजारवाडीत पाटील गटाला तर गुळसडीत बागल गटाला शिंदे गटाचा दे धक्का

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २१ / करमाळा तालुक्यातील हजारवाडी व गुळसडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आ. संजय मामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. २०२४ विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आ. संजयमामा शिंदे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी निमगाव येथे हजारवाडी येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला तर गुळसडी येथील बागल परिवाराने बागलांनाच दे धक्का करत संजयमामा शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिंदे गटात प्रवेश केला. हजारवाडी ( पोफळज ) तालुका करमाळा येथील हजारवाडी चे माजी सरपंच दादासाहेब हाके , माजी उपसरपंच भाऊसाहेब उत्तम हजारे, ग्रामपंचायत सदस्य आप्पा हजारे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग हजारे, रवींद्र रमेश हजारे, प्रेमचंद हजारे, भाऊ ईश्वर हजारे, विलास वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश केला.

गुळसडी गावचे युवा नेते सतिष बागल, समाजिक कार्यकर्ते अनुरथ बागल, डाॅ. विजय बागल, नंदकुमार बागल, सुनील बागल, पै. संदीप बागल, सुधीर बागल, अजय बागल, नितीन अडसूळ, प्रथमेश गायकवाड, कृष्णा सुरवसे, शत्रगुन जाधव, यांच्यासह, असंख्य कार्यकर्ते व सर्व बागल परिवार मित्रपरिवार यांच्यासह सर्वानी आमदार संजयमामा शिंदे  गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा फेटा बांधून सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, माजी पंचायत समिती सदस्य लव्हे चे सरपंच विलास दादा पाटील, ज्येष्ठ नेते वामनराव बदे, मकाईचे माजी संचालक रामचंद्र पवार, पोपळज सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ पवार, कंदरचे पैलवान उमेश इंगळे, करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे, भोसरे चे  पत्रकार हर्षल बागल,  झरे गावचे सरपंच प्रशांत पाटील, वागीं - 2 चे युवा नेते समाधान देशमुख, अशोक तकीक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे इं. उपस्थित होते.


आ.संजयमामांच्या कामाने प्रभावित...
आमदार संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजना सक्षमपणे चालवून करमाळा तालुक्यातील पुर्व भागाचे नंदनवन केले, त्याच बरोबर मामासाहेब यांनी केलेली विकास कामे, मामासाहेबांची काम करण्या पद्धत या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सर्व परिवार व मित्रपरिवार यांच्यासह प्रवेश करत आहोत, येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत गुळसडी गावातुन भरघोस मतदान करून पुन्हा एकदा मामासाहेब यांना आमदार करण्याची ग्वाही दिली.
       - श्री.सतीश बागल. गुळसडी.
close