shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जळगाव विद्यार्थी: नववी आणि अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती.

  

जळगाव विद्यार्थी: नववी आणि अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती.

जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : जवाहर नवोदय विद्यालयातील नववी व अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख 30 ऑक्टोंबर, 2024 असून ही परीक्षा शनिवार 8 फेब्रुवारी, 2025 रोजी होईल. जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या परीक्षा सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक https://cbseitms.nic.in/2024/nvsix. व 11 वी साठी https://cbseitms.nic.in/2024/nvsix.11/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            सर्व संबंधितांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचन करून नववी ते अकरावीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी बी. आर. त्रिवेदी (9422797110), हर्षद पवार (9921297951) तसेच रामकुमार वर्मा संगणक शिक्षक (8720062152) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन, प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.


close