shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कोणाला निम्मेच तिकीट, तर कोणाला मोफत प्रवास आहे !एस टी बस ची अत्यंत दयनीयअवस्था,त्याकडे कोण पाहे?


*एस टी बस चे तुटके बाकमुळे कोपरगांव तालुक्याच्या टाळकी,रवंदा, सांगवी भुसार,धामोरी चासनळी या मार्गावरील प्रवाशांचे होत आहे प्रचंड प्रमाणात हाल

कोपरगांव / प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत कोपरगांव आगारातील टाळकी, रवंदा, सांगवी भुसार,धामोरी चास नळी या मार्गावरील एस टी बस मधील आसन व्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था झालेली असल्याचे बघावयास मिळते आहे.

      सदरील मार्गावर एस टी बस प्रवाशांनी फुल्ल भरलेली असता बस मधील काही आसन व्यवस्थेचे बाक अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे. या तुटलेल्या आसन व्यवस्थेची दयनीय अवस्थेमुळे काही प्रवाशांना उभे राहुन प्रवास करणे भाग पडत आहे.
बसमध्ये उभे राहुन प्रवास करताना तोल जावू नये म्हणून तुटलेल्या बाक चे सहारे घ्यायचे ? की, तुटलेले बाक बसमध्ये इतरत्र मागे पुढे जावू नये म्हणून त्यांना धरुन ठेवायचे ? असा संभ्रम निर्माण होवून प्रवाशांची मोठी पंचायत निर्माण होत आहे.
       शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेद्वारे एस टी बस मध्ये कोणाला निम्मेच तिकीट तर कोणास मोफत प्रवास आहे,मात्र एस टी बस ची झालेली दुरवस्था याकडे कोण पाहे असे म्हण्याची वेळ प्रवाशांवर येवून ठेपली आहे.आणि आतातर दीपावली सण येत असल्याने  एस टी बस मध्ये प्रचंड गर्दी ही होणारच आहे, तेव्हा या दयनीय आसन व्यवस्थेची सुधारणा होईल तरी केव्हा ? याकडे देखील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. तरी संबधित महाराष्ट्र राज्य परिवहन ( एस. टी.) महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणी कोपरगांव आगारातील प्रमुख अधिकारी यांनी सदरील बाबी त्वरित दखल घेवुन या दयनीय आसन व्यवस्थेची सुधारणा करावी अशी मागणी रवंदा,सांगवी भुसार,धामोरी चास नळी येथील प्रवाशांकडुन केली जात आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close