प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८ / नशा मुक्त भारत अभियान सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान हे उपक्रम विद्या भवन हायस्कूल कळम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांनी आयोजि केला. रोटरी क्लब ऑफ कळम हे सामाजिक उपक्रमास नेहमीच सहकार्य करतात व असे अनेक उपक्रम राबवितात. या उपक्रमात 600 विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक वृंद यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष माननीय अरविंद शिंदे सर तसेच हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री पवार सर उपस्थित होते.
नशा ही समाजाला लागलेली कीड आहे त्यातून समाजाला बाहेर निघावे लागले त्याची सुरुवात आपल्या पासून सर्वांनी करावी असे मत ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील अनेक पालकच मुलांना तंबाखू, गुटखा, दारू इत्यादी गोष्टी आणण्यास सांगतात मुले हे अनुकरण प्रिय असतात लहान वयात मुलांना चांगले संस्कार होणे आवश्यक आहे याची जाणीव पालकांनी ठेवावी. तसेच शाळकरी वयातच मुलांना व्यायामाची सवय लावणे आज काळाची गरज आहे. याची सुरुवात पालकांनी देखील करणे आवश्यक आहे असे मत ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना व्यायामाचे जीवनातील महत्त्व समजून सांगितले आणि किमान 40 मिनिटे दररोज व्यायाम करावा असे आवाहन त्यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक पालक यांना केले. यावेळेस मुलांकडून बेसिक व्यायाम करून घेतला. अभियानाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी महेश वैद्य यांचा सत्कार केला. तसेच रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे अध्यक्ष माननीय अरविंद शिंदे सर यांचा सत्कार पवार सर यांचा हस्ते करण्यात आला. सदर अभियान मोठ्या उत्साहात पार पाडला.