*संपूर्ण तालुक्यातून मोतीबिंदूला हद्दपार करण्याचा निर्धार*
इंदापूर: निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रवीण माने यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरास आज सकाळी १० वाजल्यापासून सुरवात झाली. निरवांगी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत मोफत नेत्र तपासणी करून घेतली आहे.
सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या हस्ते निरवांगी येथील या शिबिराचे उदघाटन पार पडले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दशरथ माने यांनी आपले सुपुत्र प्रविण माने यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यातून मोतीबिंदू आजाराला हद्दपार करण्याचा निर्धार केला असून यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
संग्राम माने, अक्षय माने व निलेश माने यांनी निरवांगी येथील या मोफत नेता तपासणी शिबिराचे आयोजन केले होते तर निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर यांनी या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सांभाळले.
निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सकाळी १० ते ५ या वेळेत १२०९ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ९७३ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर ३५ नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुभाष आण्णा नलवडे सर, नाना पोळ, बबन लावंड सर, राजेश जामदार, दिलीप माने, सुनील खाडे, शरद जाधव, डॉ. विकास शहा, अमोल मुळे, बाळासाहेब गायकवाड, राजू रासकर, संतोष पोळ, बबन शेख, नामदेव रेडेकर, संजय डोनाल्ड शिंदे, नारायण शिंदे, समदभाई सय्यद, किसनराव पिंगळे, भरत जाधव, निवृत्ती पेडकर, राजू जाधव, अशोक पोळ, डॉ. शरद शिर्के, डॉ. तमन्ना मॅडम, डॉ. संतोष रणवरे, सुहास माने व आशा स्वयंसेविका यावेळी उपस्थित होत्या.