shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

असा ही एक अनमोल वडार रत्न - श्री एस. एन. पवार

      चला तर जाणून घेऊ या स्वतंत्र काळानंतर वडार समाज म्हटले की गरिबी दारिद्र्य, दारुड्या, गुलामगिरी, प्रामाणिक कष्टाळू या चौकटीत असलेले पैकी काही व्यक्ती चौकटीच्या बाहेर येवून शिक्षणाला (प्राधान्य) महत्त्व देवून शिक्षण साठी काय पण करायला तयार असतात त्याला पैसा अडका शेती जुमाला घर संपत्ती वाहने इ. जिद्दीसमोर फिक्के पडत असतात.

       आजच्या जगात काही जणांना बहाणा हवे असते, आपले दोष इतरांना दोष देत असतात, मला हे असते तर ते केले असते  मी अमुक व्यक्ती झालो असतो. असे बकवास गप्पा ऐकायला मिळतात. पण कष्ट नको आहे सर्व काही फुकट मिळाले पाहिजे. अठरा विश्व दारिद्रयातून मार्ग काढत शिक्षणाची कास धरून तो वडार समाजाचा पहिला व्यक्ती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे संचालक होतो आणि केवळ नोकरीच नाही समाजाचे काही देणे आहोत यासाठी काही क्रांती घडवून समाजसेवा आधीपासून करीत आहे. अशा धूरंधर अनमोल  वडार रत्नाचा आज परिचय देत आहे.

        मा. श्री. सुखदेव नामदेव तथा एस. एन. पवार - यांचा जन्म दिनांक -०३-०१-१९५१ असून  ते वडदेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील असून त्याचे शिक्षण एम ए बी एड झाले असून ते महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे संचालक पद भूषवले आहेत आणि सेवानिवृत्त -२००९ झाले आहेत.
       आता ते पूर्ण वेळ वडार समाजाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. त्याचा मोबाईल नंबर - ९४२०४९६५३८ हे आहे

*मा श्री सुखदेव नामदेव तथा एस एन पवार यांचे बालपणी वाटचालीचे चे हकीगत मांडत आहे.

 १) घरी आईवडील पूर्णतः अशिक्षित होते मोल मजुरी करीत उपजीविका करीत होते

२) गावच्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीला फक्त एक शिक्षक अशा एक शिक्षकी शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण. गावच्या शाळेत पुढील शिक्षण नसल्याने शेजारच्या गावात दररोज पाच किलोमीटर पायी जाणे येणे करत पाचवी ते सातवी शिक्षण घेतले

 ३) पंढरपूरच्या गौतम विद्यालयात मध्ये त्या काळात एस एस सी - मार्च १९६७ सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले

)  इयत्ता ८ वी ते बी एड ,पूर्णतः वसतिगृहात राहून शिकले आहेत

५)  सन १९७१ मध्ये शिवाजी विद्यापीठात ( भूगोल विषय घेऊन ) प्रथम येऊन( गोल्ड मेडल ) सुवर्ण पदक घेतले

६)  सन १९७१ वर्षीच सोलापूरच्या दयानंद कॉलेजमधून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाच्या महाराष्ट्र पातळीवरील  ( राज्यस्तरीय)विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कॉलेज तर्फे निवड झाली होती

७) दयानंद महाविद्यालयात सोलापूर मध्ये सन १९७१ मध्ये एम ए ( भूगोल) अभ्यासक्रम  नव्हते. म्हणून शिवाजी विद्यापीठाचे  तत्कालीन  माननीय कुलगुरूं आप्पासाहेब पवार यांना दयानंद महाविद्यालयात सोलापुरात येथे एम ए (भूगोल )ची सोय करा अन्यथा  बी एड ला प्रवेश द्यावा असे थेट पत्र दिले .त्याची दखल घेऊन कुलगुरूंनी स्पेशल केस म्हणून सोलापूरच्या बी एड कॉलेजमध्ये  प्रवेश मिळवला

८) करमाळा जिल्हा सोलापूर येथील ख्यातनाम हायस्कूल  मध्ये  माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी १२ वर्षे करीत असताना एम ए (मराठी )-१९७६( बाहेरून )  शिवाजी विद्यापीठात दुसरा आले.

 ९) शिक्षकाची नोकरी करीत असताना एम पी एस सी परीक्षा -१९८३ साली देऊन विमुक्त जाती करिता राज्यातून एकच पद असलेल्या थेट जिल्हा  शिक्षण अधिकारी पदी नियुक्ती मिळवली पुढे शिक्षण उप संचालक , शिक्षण सहसंचालक ,आणि अखेर राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च  शिक्षण संचालक पद मिळवणारे आपल्या वडार समाजातील पहिले शिक्षण संचालक आहेत

१०) कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने केंद्र सरकार संचलित महाराष्ट्रातील अनौपचारिक शिक्षण केंद्र पुणे चे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून तीन वर्ष  (निवृत्तीनंतर ) करिता सन २०१५ ते २०१७ पर्यंत  नियुक्ती दिली
    यामुळे श्री सुखदेव नामदेव तथा एस. एन. पवार साहेबांची वडार समाजातील जन माणसात सामाजिक कार्य कळावे त्यांचे पासून  युवा पिढीना आत्मविश्वास प्रेरणा, ऊर्जा मिळावे त्यातून समाज घडावा कुटुंबाची, समाजाची, राज्याचे, राष्ट्राचे उंची वाढावे म्हणून समाज कार्याची माहिती देत आहे

१) कोल्हापूरला जिल्हा प्रौढ शिक्षण अधिकारी असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड या भागातील देवदासींची प्रथा संपुष्टात आणणे करिता , राज्यात एकाच वेळेस शासकीय पदावर असताना त्या भागातील १७ देवदासींच्या जटा निर्मूलनाचा जाहीर कार्यक्रम  घेतला.   तत्कालीन राज्याचे संचालक उपस्थित होते आणि त्याचे प्रसारण तत्कालीन दूरदर्शनवर देखील झालेले आहे. ही घटना १९८६ सालाची आहे.

२)  सन १९८४ ते १९८७  या काळात ग्रामीण भागात प्रौढ शिक्षणाचा उठाव होण्याकरता ग्रामीण भागातील साखर कारखाने, दूध संस्था, अन्य काही सेवाभावी संस्था यांच्याकडून त्या काळात कमीत कमी दोन ते तीन लाखांची बक्षिसे समाज वर्गणीतून प्रौढ शिक्षण वर्गांना मिळालेली आहेत. त्याची नोंद तत्कालीन शिक्षण खात्याने घेतलेली होती.

३) शिक्षणाधिकारी सोलापूर येथे असताना १९८८-१९८९ या काळात जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व पूर्ण प्राथमिक शाळाना  शासनाचा एकही पैसा न घेता स्थानिक लोक वर्गणीतून त्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक कार्यालय बांधून घेतले याची नोंद संपूर्ण शिक्षण खात्याने त्या काळात घेतली आहे.

४) सोलापूर मधील त्यांचे  वडदेगाव आणि आळंदी या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळांना मंदिर बांधकामासाठी उदार हस्ते अनेक  देणग्या साहेबांनी स्व:खुशीने दिलेले आहेत

५) साहेबाच्या गावातील वडदेगाव, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे  अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत २५ वर्ष पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २६ जानेवारीला त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ बक्षिसे अनेक वर्ष देत आहेत.

६) पंढरपूर येथे एका शासनाची कुठलीही मदत न घेता एड्सग्रस्त पालकांच्या मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण देणाऱ्या एका संस्थेत गेली २० वर्ष  त्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून एक दिवसाचे पूर्ण जेवण  देण्याकरता देणगी गेली अनेक वर्ष देत आलेले आहेत.

७) त्यांचा शिक्षण क्षेत्रातील कामाची चढता आलेख उंचावत असताना त्या कामाची शासनाने नोंद घेऊन  सेवा निवृत्त झाल्यावर २००९-२०१० एक वर्षे एक्सटेन्शन दिले.

८) असोसिएशन ऑफ सिनिअर सिटीजन ऑफ पुणे, आणि बाणेर बालेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघातील त्याचे सेवाभावी काम पाहून बाणेर नागरी सहकारी  पतसंस्थेने त्यांना सन २०१९-२० सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन  देऊन गौरविले आहे.

९) कोल्हापुर भागात विभागीय शिक्षण उपसंचालक पदी काम करत असताना त्यांचे कामाची नोंद घेऊन कराड येथील एका शिक्षण संस्थेने त्यांना सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार करून गौरविले आहे.

१०)  त्यांचे कार्य काळातील विविध पदावर असताना पदाचा योग्य वापर करून त्यांचे गावातील त्यांचे नात्यातील आणि अन्य अशा किमान ६० ते ७० मुला - मुलींना  कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मोफत त्यांना शाळा संस्थांमध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्यांची कुटुंबे आज उत्तम प्रकारे प्रगतीशील झाली आहेत. त्यांचे आशीर्वाद  सगळ्यात महत्त्वाचे वाटतात.

११) आता  वडार समाजातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी आणि वृद्धांची सेवा करण्याकरता त्यांनी " जय बजरंग सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघ,पुणे " या नावाने नुकतेच नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलेला आहे. त्यात अनेक सेवाभावी उपक्रम राबवायचे नियोजन आहे. संस्थेचे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचारी सदस्य आहेत अनेक मित्र परिवार, सेवाभावी पदाधिकारी, उच्च शिक्षित व विभूषित अनेक उद्योजक, कुटुंब नाळ जोडली जात आहे.

"साहेबांच्या पुढील काळात समाज क्रांती घडो प्रगती व्हावे यशस्वी व्हावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे."

जय बजरंग! जय हिरोजी इटलकर!!जय वडार!!!

शब्दांकन - श्री अशोक पवार पुणे - ९२२५५०३७७०
close