shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डिजिटल अरेस्ट फ्रॉड पासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे - सध्या सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना लुबाडण्यासाठी एक नविन भयभीत युक्ती शोधून काढली आहे ती म्हणजे डिजिटल अटक होय. हे एकूनच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे डिजीटल अटक म्हणजे काय ? एका व्यक्तीला अज्ञात व्यक्तीकडून व्हिडीओ कॉल येतो आणि व्हिडीओ कॉल उचलताच समोरील व्यक्ती ही बनावट पोलिस अधिकारी, आयपीएस अधिकारी किंवा भारतीय प्रशासनिक सेवेतील मोठा अधिकारी यांच्या पोषाखात बोलतो की, तुम्हाला डिजीटल अटक करण्यात आलेली आहे कारण तुमच्याविरुध्द आमच्याकडे विविध तक्रारी आलेल्या आहे किंवा तुम्ही पाठवलेले पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडलेले आहे असे भासवून तुमच्याशी बरेच तास बोलून ते तुम्हाला डिजीटल अटक करण्याची धमकी देतात आणि तुमच्याकडून तुमची खाजगी माहिती जसे की, आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स इ. ची संपुर्ण माहिती घेवून तुमचे बँक खाते रिकामे करतात. म्हणुन नागरीकांना सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी आवाहन केले आहे की, अज्ञात व्यक्तीकडून येणा-या कुठल्याही व्हिडीओ कॉलला प्रतिसाद देवू नका, नेहमी लक्षात ठेवा कुठलाही पोलिस अधिकारी, आयपीएस अधिकारी किंवा भारतीय प्रशासनिक सेवेतील मोठा अधिकारी तुम्हाला ऑनलाईन अटक किंवा डिजीटल अरेस्ट करु शकत नाही कारण कायदयात डिजीटल अरेस्ट नावाची कुठलीही तरतूदच नाही. 

समोरच्या व्यक्ती म्हणजे तोतया अधिकारी त्याच्या अकौंटवर पेमेंट करायला सांगतो किंवा तुमची व्यक्तीगत माहिती तुमच्या मोबाईल मधून चोरण्याच्या देखील प्रयत्न करतो आणि येथेच तुमची फसतात. अशावेळी नागरीकांनी पॅनिक होवू नये आणि फसवणुक झालेल्या नागरीकांनी आपली तक्रार १९३० या टोलफ्री नंबरवर तक्रार करावी व सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहावे असे आवाहन सायबर ॲवरनेसचे फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. चैतन्य भंडारी यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
close