प्रतिनिधी :-प्रमोद चौधरी |
एरंडोल:- येथे सोनार समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्याचे निमित्त म्हणजे सरकारने सोनार समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे सोनार समाजाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. एरंडोलच्या सुवर्णकारांनी एकत्र येऊन पेढे वाटून आणि फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा केला.
या कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष सचिन भाऊ विसपुते, श्री जगदीश मोरे श्री नारायण मोरे न्यू नंद टेन्ट हाऊसचे संचालक बापूशेठ श्री संजय पल्लीवाळ श्री सतीश पल्लीवाळ श्री किशोर सोनार शरद चोपडकर श्री सिद्धेश वाघ साई सोनार श्री दुर्गादास पल्लिवल अतुल सोनार राहुल देवरे श्री जगदीश सोनार श्री सुधीर मोरे ,श्री वैभव भामरे, श्री भिका शेठ देवरे श्री अनिल भामरे यांच्या सह समाजाचे बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.