shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

केज मतदारसंघातून पुन्हा नमिताताईना गुलाल लागणार प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला सभेचे स्वरूप...


----------------------------------------------------------------------- प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
जि. प सदस्य विजयकांत मुंडे, राणा डोईफोडे, शेख रहीमभाई, सुनील गलांडे व मान्यवर नेत्यांची उपस्थिती 
-----------------------------------------------------------------------
.          
 केज विधानसभा मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या आमदार तथा उमेदवार आ.नमिताताई मुंदडा यांनी मतदार संघातील केज, नेकनुर आणि परिसरातील गावातील प्रमुख नेत्यांची बैठक काल शनिवार दि.19 आक्टोबर रोजी आई निवासस्थानी घेतली. या बैठकीत गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर तळागळामध्ये विकास निधी पोहचविण्याचा आपण प्रयत्न केला असून सरकारनेसुद्धा मतदार संघासाठी भरीव निधी दिला असून सर्व कार्यकर्त्यांनी सरकारने केलेल्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी व सामान्य माणसासाठी केलेल्या कामाची माहिती करुन द्यावी असे आवाहन करण्यात आले.

 या बैठकीला केज विधानसभा मतदार संघातील जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, जोगाईवाडीचे सरपंच बालासाहेब दोडतल्ले, जेष्ठ नेते शेख रहिमभाई, नगरसेवक शेख ताहेर, कल्याण काळे, तसेच माजी नगरसेवक अनंतदादा लोमटे,  मोरेवाडीचे सरपंच औदुंबर मोरे, नगरसेवक अतुल देशपांडे, संतोष शिनगारे, होळचे नेताजी शिंदे, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, भगवान सेनेचे मुरलीधर ढाकणे, सुनिल घोळवे, राहुल गदळे, महादेव सुर्यवंशी, राजाभाउ मुंडे, जि.प.सदस्य राणा डोईफोडे, पत्रकार प्रकाश मुंडे, भारत काळे, नगरसेवक संजय गंभीरे, भाजप नेते हिंदुलाल काकडे, भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.वसुदेव नेहरकर, जेष्ठ नेते सुनिल आबा गलांडे, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर काचगुंडे, विकास जाधव, दत्ता सावंत, संतोष जाधव,जाधवर सरपंच, सुरेश नांदे, खद्दीर खुरेशी, प्रशांत अदनाक यांच्यासह इतर मान्यवर नेते उपस्थित होते. पुढील आठवड्यात आ.नमिताताई मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहिर झालेली नसली तरी एक दोन दिवसात उमेदवारी जाहिर होईल.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख कळविणार असल्याचे सांगण्यात आले. 


तर उपस्थितांना संबोधित करताना आ.नमिताताई मुंदडा म्हणाल्या की, केज विधानसभा मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या मतदारांनी गेल्या पाच वर्षात विकास कामाच्या या प्रक्रियेत भरभरुन साथ दिली केज विधानसभा मतदार संघात काम करत असताना अनेक विकासकामे व प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला. विकास कामे करण्यासाठी प्राधान्याने महायुती सरकारचे व विशेषत आ.पंकजाताई मुंडे, माजी खा.प्रितमताई मुंडे यांची साथ, सहकार्य आणि मार्गदर्शन सतत राहिली म्हणून आपण या मतदार संघात चांगले काम उभे करु शकलो येणार्‍या काळात सुद्धा महायुतीचेच सरकार येणार यात कसलीही शंका नाही कारण राज्यभरात  मोठ्या प्रमाणात विकास कामे आणि प्रकल्प आले आहेत गरीबांचे व सर्वसामान्यांचे सरकार म्हणून राज्य सरकारची ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा केज विधानसभा मतदार संघाला पुढे नेण्यासाठी आणि प्रगतीची नवी पाउल वाट निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करावा आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहचवावी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात छोट्या घटकांचा विचार केलेला आहे. ज्यामध्ये लाडकी बहिण, लाडका भाउ, वयोश्री योजना, अमृत अटल योजना व विविध योजना या तळागाळागतील मतदारांसाठीच योजील्या होत्या. या सर्व योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा जिंकण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे लढण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन केले. 
यावेळी मतदारसंघातील जेष्ठ नेते व पदाधिकारी यांनीही मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन व सुचना केल्या. जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व इतरांनी महत्वपूर्ण सुचना करुन नव्या आव्हानाला समोरे जावून जिंकण्यासाठी सज्ज व्हावे असे सांगितले.
close