shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आ. संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

36 गावाप्रमाणेच  करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये तोच जोश आणि उत्साह

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा:     2024 विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्यासाठी उमेदवारांचे गाव भेट दौरे सुरू आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांनी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आणि 29 तारखेपासून करमाळा तालुक्यात गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली. मंगळवारी त्यांनी देवीचा माळ येथे दुपारी 2 वाजता प्रचाराचा नारळ फोडला. दिवसभरात त्यांनी देवीचा माळ, हिवरवाडी, भोसे, वंजारवाडी, लिंबेवाडी व रायगाव या गावांना भेटी दिल्या. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे उत्साहात स्वागत केले.

दिनांक 30 ऑक्टोबर बुधवार रोजी पांडे, मांगी, वडगाव उत्तर, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, बिटरगाव (श्री), कामोणे येथे कॉर्नर बैठका झाल्या. त्यानंतर सायंकाळी पोथरे येथे सभा झाली. या दौऱ्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी वाजतगाजत स्वागत होत आहे. पोथरे येथील सभेत बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, आपण फक्त विकास कामांवरच निवडणूक रिंगणात उतरलो आहे. यापुढेही विकास कामे करायची आहेत. या सर्व गावांची मुख्य समस्या पाणी. सुदैवाने या पंचवार्षिक मध्ये कुकडी प्रकल्पाचे पाणी बंद पाईपद्वारे मांगी तलावात सोडण्यात यावे यासंदर्भात पाठपुरावा केला. त्याच्या सर्वेचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असतानाच प्राप्त झाले होते. कुकडी प्रकल्पावरती अवलंबून असलेला मांगी तलाव पूर्ण क्षमतेने भरला पाहिजे आणि  लाभक्षेत्रातील गावांना त्याचा फायदा झाला पाहिजे यादृष्टीने प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी मांगी तलावत सोडणे आणि त्या माध्यमातून या भागाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. काम करत असताना मी माझा व विरोधातला असा कधीही भेदभाव केला नाही. आलेल्या प्रत्येकाचे काम करण्यावर माझा भर आहे असे यावेळी आमदार शिंदे म्हणाले.
close