shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री केशवराज मंदिर भक्तनिवास पुनर्बांधणी भव्यदिव्य होणार - मा . मंत्री दिलीपराव देशमुख


लातुरचे श्री केशवराज मंदिर भक्त निवास पुनर्बांधणी विस्तारीकरण बांधकामाचा  भूमिपूजन सोहळा संपन्न

प्रतिनिधी : संजय वायकर

लातूर :   जुन्या लातूर भागातीलच नव्हे तर संपूर्ण लातूर वासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री केशवराज मंदिरच्या भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरणाचे काम लातूरमधील सर्वात उत्कृष्ट आणि भव्य - दिव्य स्वरूपाचे होईल, असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनीयेथे बोलताना व्यक्त केला आहे. ते सोमवारी लातूर शहरातील पुरातन व स्वयंभू श्री केशवराज मंदिरच्या भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.


या कार्यक्रमाचा शुभारंभ यज्ञमार्तंड प.पू. यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलूकर यांच्या हस्ते  तर  उदघाटन  माजी मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मंचावर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, लातूर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे , श्री केशवराज मंदिरचे अध्यक्ष अँड संजय पांडे, उपाध्यक्ष बजरंगलाल रांदड, सचिव अशोकराव गोविंदपूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मंदिराच्या मोकळ्या जागेचा प्लॅन करा त्यालाही मदत करू

 यावेळी आपल्या मार्गदर्शनात माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की  माणूस धार्मिक असावा, धर्मनिष्ठ असावा, पण धर्मांध नसावा असे सांगुन आपला हिंदू धर्म सनातन आहे. या धर्माचा कोणी संस्थापक नाही. हिंदू धर्मातही त्याग, क्षमा, करुणा आहे. या सगळ्या गोष्टींचे जतन करणे हे या धर्माचे सर्वात मोठे यश आहे. हा राजकीय नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रम असून श्री केशवराज मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे. या मंदिराच्या माध्यमातून विविध सामाजिक जबाबदाऱ्याही पूर्ण केल्या जातात, ही  अतिशय महत्वाची बाब आहे असे सांगून मंदिराच्या विश्र्वस्तांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले करत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे पुरातत्व खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी असताना त्यांनी या मंदिराच्या विकासासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या कामाचा शुभारंभ आज झाल्याचे त्यांनी सांगितले भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरणाच्या या कामासोबतच मंदिराच्या बाजूच्या मोकळ्या जागेच्या विकास कामाचाही प्लॅन करावा. ते कामही पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे दिलीपराव देशमुख यांनी स्पष्ट केले.  असे सांगुन लातूरच्या राजकीय क्षेत्रात वावरताना आपण राजकीय संस्कृती जपलीय . प्रत्येकाने आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राच्या संस्कृतीचे, त्याच्या  धर्माचे  पालन करणे  आवश्यक असते, असे सांगून त्यांनी यावेळी सुसंस्कृतपणा, नैतिकता, भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण यावर अत्यंत मौलिक विचार व्यक्त केले.



आगामी काळात महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास विकासासाठी मी कटिबध्द - - माजी मंत्री आ . अमित देशमुख यांचे प्रतिपादन

त्यावेळी अमित देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना श्री केशवराज मंदिराच्या या विकास कामासाठी आपण अडीच कोटी रुपयांचा जो निधी मंजूर केला आहे, तो निधी या विकास कामाचा पहिला हप्ता समजा, यापुढील काळात आपल्या  विचाराचे सरकार आल्यास मंदिराच्या सर्वच विकास कामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आज समाजकारणात, धर्मकांडातही भ्रष्टाचार होताना दिसतोय हे सांगताना त्यांनी तिरुपतीच्या लाडू प्रकरणाचा विषय उपस्थित केला. राज्यातील विद्यमान सरकारचा पायाच भ्रष्टाचार आहे. अशा भ्रष्ट सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होईल,असा विश्वासही आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला. 

यावेळी मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे  यांनी आपले विचार व्यक्त करताना मंदिराच्या विकास कामासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या तांत्रिक आणि प्रशासकीय कामांसाठी  आपण तत्पर असल्याचे सांगितले. मंदिरचे अध्यक्ष अँड संजय पांडे यांनी या मंदिराच्या गाभाऱ्याची उभारणी १२ व्या शतकात झाली असून अशा प्रकारच्या सामाजिक कार्याला राजाश्रयाची नितांत आवश्यकता असते असे सांगितले. या मंदिराच्या विकास कार्याबरोबरच देशपांडे गल्लीत असणाऱ्या सूर्य मंदिराचे अर्धवट कामही पूर्ण करण्यासाठी आपण  सहकार्य करण्याचें आवाहन केले.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख अमीत देशमुख धीरज देशमुख यांनी केशवराज मंदिराचे दर्शन घेतले प्रचार सुरू झाला

मंदिराचे सचिव अशोक गोविंदपूरकर यांनी आपल्या प्रास्तविकात  मंदिराच्या संपूर्ण कार्याचा आढावा संक्षिप्त स्वरूपात विशद केला. या मंदिराचे माहात्म्य विशद करताना त्यांनी सन  १९९९ साली पहाटे साडेपाच वाजता दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख मंदिरात अभिषेकला आले होते. अभिषेक करून ते प्रसाद घेऊन गेले आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर आपण २०१२ च्या मनपा निवडणुकीत पूजा केली पण प्रसाद न घेता गेलो आणि मनपा निवडणुकीत पराभूत झालो, असे  सांगितले.  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख आणि आ. धीरज देशमुख यांनीही श्री केशवराजाचे दर्शन, प्रसाद घेतला आहे. त्यामुळे या दोघांनीही आता निवडणुकीची चिंता सोडावी प्रचाराची ही रणधुमाळी सुरू झाली असेही गोविंदपूरकर यांनी बोलून दाखवताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाट झाला
यावेळी यज्ञेश्वर रंगनाथ महाराजांनी आपल्या मनोगतात सर्व उपस्थितांना शुभाशिर्वाद दिले.

देवस्थांनसाठी कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार

यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख धीरज देशमुख यांच्या हस्ते देवस्थानसाठी  उत्कृष्ट काम करणाऱ्या अण्णा प्रभाकर पाठक , संजय श्रीकृष्ण अयाचित, गौस शेख, अभियंता शाम देशपांडे, केंद्रे, रविशंकर जाधव  यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 

यावेळी कार्यक्रमास राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख अँड कालिदास देशपांडे, हरिराम कुलकर्णी, संभाजी सुळ गणेश देशमुख,बाळासाहेब देशपांडे संजय नीलेगावकर, शिवाजी कांबळे, बंडोपंत कुलकर्णी, दत्तात्रय लोखंडे, श्री पतंगे, अरुण समुद्रे रामेश्वर बद्दर यांच्यासह मान्यवर महिला पुरुष मोठया प्रमाणावर उपस्थित होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बसवंतप्पा  भरडे  यांनी तर आभार योगेश उन्हाळे यांनी मानले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त पापासेठ  ताथोडे , मधुकर पाठक , एड. कालिदास देशपांडे, मनोहर सावळे, राजाभाऊ पांडे, दामुशेठ भुतडा, मधुसूदन भुतडा, सुनील अयाचित, शाम कोटलवार, सुमुख गोविंदपूरकर उपस्थित होते 

देशमुख कुटुंबांनी केली मंदिर परिसराची पाहणी

यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी मंदिर परिसरातील पाहणी केली प्राचीन काळात असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती बघितल्या तत्पूर्वी मंदिर परिसरातील मान्यवरांनी केशवराज मंदिर येथे  दर्शन घेतले
close