shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न


नगर /  प्रतिनिधी: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय सरमिसळ  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

     या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी  उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मनुष्यबळ व्यवस्थापन समन्वयक अतुल चोरमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर उपस्थित होते.
अहिल्यानगर  जिल्ह्यांतर्गत बारा विधानसभा क्षेत्रासाठी ४ हजार ९३२ मतदान केंद्राध्यक्ष, ४ हजार ७६१ प्रथम मतदान अधिकारी तसेच ४ हजार ९०१ पुरुष व ६ हजार २१५ महिला अशा इतर मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

     सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिले प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अ.नगर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
close