shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ३८ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न. संस्थेचे जेष्ठ कृष्णराव मगर यांना संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित.

भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ३८ वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न. 
संस्थेचे जेष्ठ कृष्णराव मगर यांना संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने केले सन्मानित. 
इंदापूर: सुरवड तालुका इंदापूर येथे भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ३८ वी वार्षिक सर्व साधारण सभा श्री कृष्णा मंगल कार्यालय सुरवड या ठिकाणी (दि. २९)पार पडली. या सभेमध्ये  कृष्णराव मगर व १९६९ चे सर्व संस्थापक संचालक यांचा सन्मान सोहळ्यात कृष्णराव श्रीरंग मगर यांचा श्री भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरवड सर्व शेतकरी सभासद व ग्रामस्थ यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन नागरी सत्कार करण्यात आला. 

श्रीकृष्णराव मगर हे सुरवड गावचे सुपुत्र १९६९ साली सिव्हिल इंजिनियर झाले व पाटबंधारे खात्यामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून तीस वर्षे सेवा केली. आपल्या शिक्षणाचा पदाचा व अनुभवाचा आपल्या गावाला उपयोग व्हावा, आपल्या  काळ्या आईसाठी काहीतरी करावं यासाठी त्यांनी १९८७ साली श्री भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. भीमा नदीपात्रातून दोन स्टेजमध्ये पाण्याचा उपसा करून या भागातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्याचे काम केले. या भागातील कोरडवाहू असलेली जमीन बागायती झाली. गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी पिके घेणारे शेतकरी आता ऊस, डाळिंब, द्राक्ष यासारखी पिके घेऊ लागली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक परिवर्तन झाले. गावचा पूर्ण कायापालट झाला .या भागात मगर कुटुंबीयाचा आदर केला जातो. त्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून त्यांना सर्व सभासद व ग्रामस्थांच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक चेअरमन  दत्तात्रय घोगरे यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन भरत कोरटकर यांनी केले 

या सभेसाठी मल्ल सम्राट  रावसाहेब  मगर , ज्ञानदेव मगर , सुरेश मेहर, दादासाहेब घोगरे, दादासाहेब कोरटकर, शिवाजीराव कोरटकर, साहेबराव घोगरे, दशरथ सुर्वे,  आप्पासाहेब तोरस्कर,  बाळासाहेब घोगरे,  दिलीप घोगरे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
-----------------
सहकारी पाणीपुरवठा समान पाणी वाटप करणारी महाराष्ट्रातील ही बहुतेक पहिली संस्था .

चौकट: तसेच कृष्णराव मगर यांचे बंधू व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू  शंकरराव मगर यांचे मार्गदर्शनाखाली चेअरमन  दत्तात्रय घोगरे यांनी पाट पाणी पद्धत बंद करून समान पाणी वाटप प्रकल्प राबविला या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना समान पाणी मिळू लागले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रति एकरी दररोज शाश्वत पाणी मिळू लागले. पाण्याची बचत होऊ लागली. दुरुस्ती देखभाल व वीज बील खर्च कमी झाले. शेतीचे उत्पन्न वाढले. यामुळे या समान पाणी वाटप प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. अशा प्रकारचे पाणी वाटप करणारी महाराष्ट्रातील ही बहुतेक पहिली संस्था असावी. 
-------------------------------
फोटो ओळ: भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ३८ वी वार्षिक सर्व साधारण सभेत कृष्णराव मगर यांना जीवन गौरव पुरस्कार देताना संस्थेचे मान्यवर.
close