shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विद्यानिकेतनच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेत जिंकली अनेकांची मने


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमध्ये नुकतीच वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत इ.पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेल्या यशप्राप्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षक- मान्यवरांची मने जिंकली. 

स्पर्धेतील विद्यार्थ्यांमधून अनुक्रमे इ.पहिली (लोटस) - विहान सोनवणे, विहान धुवावीया,स्वरुप पटारे
इ.पहिली (रोझ) - काव्या परदेशी, नबीहा सय्यद, श्राव्या मेटे,इ.दुसरी (लोटस) -अरहान पोपटिया, मेघना  आहेर, श्रीराज खरात, इ.दुसरी (रोझ)शरण्या मंधारे,श्रेया गौड, ओंकार गधे,इ.तिसरी (लोटस) -विश्वजीत  मोरगे, स्वरांगी भवार,सोफिया पठाण,इ.तिसरी (रोझ)-
स्वरा परदेशी, अरोही त्रिभुवन, पियुष बिडलान हे विद्यार्थी यशस्वी झाले.

          स्पर्धेत विद्यार्थ्यांना वर्गनिहाय नेचर,कार्टून,
सुपरहिरो, इंडियन कल्चर या थीम देण्यात आल्या होत्या.यावेळी परीक्षक म्हणून प्रतिमा किशोर साळुंके,अश्विनी कांबळे, स्विटी प्रवीण पारख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका योगिता गवारे,सोनिका शिरसाट, साक्षी भणगे, ज्योती गाढे,ज्योती खंडागळे, प्रीती नाणेकर,कोमल पारखे, सुप्रिया बाबरस, राजश्री व्हटकर,सोनाली म्हसे,गायत्री तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
          यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, सहसचिव डॉ.अर्चना शेळके, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन ज्योती खंडागळे यांनी केले,तर आभार प्रीती नाणेकर यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close