shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बंजारा समाजाचा व वडार समाजाचे आगळे वेगळे उपोषण

 मेहकर:-
घाटबोरी ता.मेहकर जिल्हा बुलढाणा येथे बंजारा समाजाचे अंकुश श्रीराम राठोड व वडार समाजाचे राजु तुकाराम कुसळकर हे वडार समाज व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात व इतर काही मागण्यांसाठी अन्न त्याग उपोषणाला २ ऑक्टोबर २०२४ रोज मंगळवारपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपोषणाला बसले.

त्यांना वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर सर यांनी संघटनेच्या वतीने व वडार समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा दिला आहे.वडार समाजाला व बंजारा समाजाला आव्हान केले आहे.आपल्या या दोन्ही समाज बांधवांना ताकद देण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंब्याचे निवेदन आप आपल्या जिल्ह्यात देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
close