shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गाणी, फेर, दांडिया खेळत बांडेवाडी शाळेत रंगला महाभोंडला.*


*गाणी, फेर, दांडिया खेळत बांडेवाडी शाळेत रंगला महाभोंडला.*
इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी येथे महाभोंडला आयोजित करण्यात आला. उपस्थित महिलांचे हस्ते गज पूजन करण्यात आले. आश्विन महिन्यात साजरा होणारा नवरात्र उत्सव व महभोंडला खेळाविषयी मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी माहिती सांगितली.
           ज्येष्ठ महिला पारंपारिक गाणी गात फेर धरला. दांडिया खेळायला सर्वांनी सहभाग घेतला. विविध मनोरंजनात्मक खेळ खेळत आनंद लुटला. लहान मुलांना डब्यात आणलेला खाऊ आवाज करत ओळखले. टिपरी नृत्याचे विविध प्रकारचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित सर्वांना खाऊ व्यवस्था करण्यात आली. 
         प्रसंगी महिला पालक , माता पालक गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षिका कांचन रणपिसे, अंगणवाडी सेविका सुनंदा पोंडकुले, मदतनीस उर्मिला बांडे यांनी केले.

close