shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वीस वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसला मागितला न्याय- विलासराव खाजेकर


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
गेल्या वीस वर्षापासून शिर्डी लोकसभा असो किंवा श्रीरामपूर विधानसभा असो या दोन्हीही ठिकाणी केवळ एकाच समाजाला उमेदवारी दिली जाते हे जाणीवपूर्वक घडत आहे.

अनुसूचित जातीमध्ये फक्त चर्मकार समाज येत नाही तर महार (बौद्ध ,ख्रिश्चन) मातंग, मेहतर समाज येतात, गेल्या २० वर्षापासून मतदार संघाबाहेरील उमेदवार निवडले जातात तसेच जाणीवपूर्वक इतर पक्षातील पडीक उमेदवारांना आणि एकाच समाजाला उमेदवारी दिली जाते .हा बहुसंख्येने असलेल्या बौद्ध समाजावर अन्याय आहे हा अन्याय किती दिवस सहन करायचा ? या सर्व भावना तीव्र शब्दात  कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथल्ला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,ना. नितीन राऊत तसेच महाराष्ट्र राज्य  प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे ना. मुकुल वासनिक, CWC मेंबर AICC काँग्रेस कमिटी यांचे निदर्शनात विलासराव खाजेकर यांनी आणून दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात याबाबत चर्चा करून बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यास विनंती केली, संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील बौद्ध ,महार, ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. आपल्यावर जातीयवाद केला जातो आहे अशी भावना निर्माण झाल्याने इथून पुढच्या काळात काँग्रेसला मतदान करणार नाही अशी चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांनाही भोगावा लागणार आहे असे विलासराव खाजेकर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयात सर्वांच्या भेटी घेऊन सांगितले. 

यावेळी बौद्ध समाजाला उमेदवारी मिळायलाच हवी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
close