शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रविवार ०६ ऑक्टोंबर २०२४
पत्रकाराला मारहाण करणाऱ्यावर कारवाई मागणी ! भारतीय पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस या गावात दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार सचिन पवार यांना त्याच गावातील उत्तम किसन कदम ,अमोल मोहन कदम , राहुल मोहन कदम यांनी मारहण केली होती याबाबत सचिन पवार हे राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता त्या ठिकाणी पत्रकार संरक्षण कायदमान्वये तक्रार नोंदवून घेण्याची मागणी सचिन पवार यांनी केली परंतू राहुरी पोलिसांनी तसे न करता साधी अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली.
मात्र सदर घटनेचा तपास करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत दखलपात्र तक्रार नोंदविण्यात येईल असे सांगितले. परंतू याबाबत राहुरी पोलिसांनी कोणताही तपास न केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील भारतिय पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अहमदनगर व जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना निवेदन देऊन नमुद आरोपी इसमांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत व महाराष्ट्र शासन निर्णय १९ कलम २७ प्रमाणे कारवाई करणेबाबत मागणी केली आहे. तसेच सदरची कारवाई पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे .
या निवेदनावर भारतीय पत्रकार संघटन अहमदनगरचे जिल्हा मिडिया प्रवक्ता आर.आर. जाधव , जिल्हा उपाध्यक्ष संभाजी , जिल्हा समन्वयक प्रकाश निकाळे , यशवंत पाटेकर, प्रशांतराजे शिंदे , पत्रकार एन . एन. वाकचौरे , प्रसाद घोगरे , ज्ञानेश्वर कुलट , प्रगत कराड , लताताई कोकाटे , अशोक भुसारी , सचिन म्हस्के , महाराष्ट्र प्रमुख कृष्णा गायकवाड , जिल्हा अध्यक्ष सचिन पवार , सामाजिक कार्यकर्ते सुहास पारखे इ . पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून या प्रकरणाबाबत पोलिस अधीक्षक काय करणार याकडे जिह्यातील सर्वच पत्रकार संघटनांचे लक्ष लागून आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600