श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था यांनी दि. ३० सप्टे.रोजी दुपारी ४ वा. वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. संस्थेचे ४९९४ सभासद असताना या सभेस अंदाजे शंभर ते दिडशे महिला पुरुष उपस्थित होते.हे चलत छायाचित्रण केले असल्याने ते स्पष्ट होईल.महिलांची संस्था असल्याने अचानक बाहेरून आलेली पुरुष संख्या दिसत होती. नोंदवहीवर त्यांच्या सह्या कशा घेतल्या.? त्याची देखील चौकशी व्हावी.सभेस पुरेसा कोरम नसल्याने वास्तविक सभा तहकूब होऊन पुढे घेणे आवश्यक होते.तसे न करता सभेचे सर्व विषय मंजूर करण्यात आले ही बाब संस्थेच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे.
गोरे यांना सभेत बोलायची संधी मिळावी म्हणून व्यवस्थापक अण्णासाहेब जाधव यांचेकडे दोनदा लेखी अर्ज देऊ केला पण त्यांनी तो नाकारला हे अयोग्य आहे.तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या सहकार्याने अर्ज घेतला.गोरे यांनी सभेत बोलू नये म्हणून दबाव आणल्या जात होता. बोलण्याची संधी मिळाल्यावर दहा मिनिटे बोला असे सांगितले त्यामुळे सभेत महत्वाचे विषय मला घेता आले नाही असे त्यांचे म्हणणे आहे, करीता सदरील सभा ही आम्हाला मंजूर नसल्याने हरकत घेत आहोत, नफा तोटा ताळेबंद मागवून सर्व खर्चाचा तपशील मला मिळावा,या सर्व बाबींचा विचार करून कोरम नसल्याने ही वार्षिक सभा रद्द समजून पुन्हा वार्षिक सभा घेण्यात यावी अशी मागणी महिला सभासद श्रीमती शितल गोरे यांनी सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांचेकडे केली आहे. निवेदनावर अनेक खातेदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.