shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

व्ही.पी.एस मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा


शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
 सामाजिक बातमी

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. मान्यवरांनी मनोगता मधून डॉ. कलाम यांच्या जीवनाची गाथा तसेच त्यांनी देशासाठी केलेले महान कार्य याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री. योगेश कोठावदे यांनी केले. श्री. सोमनाथ दूमणे, विज्ञान विभाग प्रमुख श्री. सुभाष क्षीरसागर यांनी आपली मनोगते सादर केली.
      कार्यक्रमासाठी प्रशालीचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री श्रीनिवास गजेंद्रगडकर पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता पसायदानाने करण्यात आली.
close