shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मनोज जरांगे यांची गॅलेक्सी हॉस्पीटल, संभाजीनगरला जाऊन प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेऊन केली तब्येतीची चौकशी


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २/ संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांची गॅलेक्सी हॉस्पीटल, संभाजीनगर या ठिकाणी जाऊन प्रा. रामदास झोळ सर यांनी सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार करमाळा तालुक्यात प्रत्येक गावातून किमान '२०' मराठा सेवकांच्या नेमणुकींचे आवश्यक त्या संपूर्ण माहितीसह भरलेले साधारणत: ३५०० अर्ज भरून पूर्ण केले यासाठी दादांनी सरांच्या कामाचे कौतुक केले. तसेच १२ ऑक्टोबर २०२४ रोजी 'नारायण गड' या ठिकाणी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याच्या तयारी संदर्भातील दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वा. अंतरवली सराटी येथे आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहणे संदर्भात सूचना देऊन दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्याचे व मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी दादांनी केले. शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून संघर्ष योद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भातील विविध मागण्या मान्य करून दादांचा संघर्ष थांबवावा असा मानस प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केला. यावेळी बोलत असताना दादांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करून त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे, रवी गोडगे, बापू फडतरे, प्रशांत नाईकनवरे, परमेश्वर नाईकनवरे, तसेच प्रा. संजय जगताप सर, ओंकार दुरंदे, नागेश चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते.
close