प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ४ / अश्विन शुक्ल प्रतीपदेच्या मुहूर्तावर अहिल्यानगर च्या सावेडी उपनगरातील निर्मलनगर गाडेकर चौक येथील "निर्मलनगर तरुण मंडळ " च्या वतीने सार्वजनिक शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन मा . नगरसेवक निखिलजी वारे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे . यावेळी देवीची स्थापना व पूजा करून घटस्थापना करण्यात आली. स्थानिक युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता .
परंपरेप्रमाणे युवकांनी प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी गडावरून आणलेल्या ज्योतीचे मंडळाच्या महिलांच्या वतीने जल्लोशात स्वागत करण्यात आले . यथोचीत पुजा करून ज्योतीचे रुपांतर नंदादीपामध्ये करण्यात आले. हा नंदादीप दिवा नऊ दिवस अखंड तेवत राहणार आहे.
नवरात्र काळात सर्व ठिकाणी आदिमायेचा गजर करण्यात येतो. सकाळी व सायंकाळी सार्वजनिक आरती करण्यात येते .नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ द्वारे विजेत्या महिलेस पैठणी दिली जाते .
भाविकांना या शारदीय नवरात्रीय देवीवरील श्रद्धेचे अनेक अनुभव येत असल्याचे भाविकांमधून सांगण्यात येत आहे . नगर तालुक्यातुन काही भाविक दर्शनासाठी येत असतात.
या शुभ प्रसंगी अनेक महिला , युवक स्वयंसेवक या काळात कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करत असतात.