shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मैंदाणे ,स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रामविकास व सार्वजनिक वाचनालय मैदाने येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

पिंपळनेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर  ग्रामविकास व सार्वजनिक वाचनालयात डॉ .ए .पी .जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील  पंडित  बागुल हे होते प्रमुख पाहुणे म्हणून  राजेंद्र क्षीरसागर उमेश घरटे  धनंजय घरटे  राहुल सोनवणे , श्री सचिन देसले, संतोष बटवाडा हे होते.

व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते, वाचनालयाचे, सचिव मिलिंद महाजन यांनी वाचनालयाबद्दल विविध उपक्रमांची माहिती दिली . वाचनालयाच्या वतीने  विविध उपक्रम राबविले जातात, स्पर्धा परीक्षा , स्पर्धा  मार्गदर्शन केंद्र , तसेच  सुट्टी कालावधीत सालाबाद प्रमाणे  ह. भ. प .यशवंत आण्णा पगारे अभ्यासिका वर्ग सुरू केला जातो , ,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची मागणीनुसार स्पर्धा परीक्षेची फी , शालेय फी  देखील भरली जाते , त्यांनी मागितलेली विविध स्पर्धा परीक्षांची ग्रंथ उपलब्ध केली जातात, या वाचनालयास  गावातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय , मैंदाने विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  सर्वांना मोफत सभासद करून विविध प्रकारचे ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यात येतात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धनंजय घरटे यांनी डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा परिचय सर्व उपस्थितांना करून दिला, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पंडित बागुल यांनी ग्रंथालयाचा उपयोग पूर्णपणे विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी करून घ्यावा व वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रमात सहभाग नोंदवावा असे उपस्थितांना सुचित केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचंलयचे  ग्रंथपाल सौ गीतांजली महाजन /पगारे यांनी केले  केले आभार सौ संध्या देवरे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी यशस्वीतेसाठी  अशोक चौरे , राकेश शिंदे, राजेंद्र कोतकर ,सचीन पाटील यांनी प्रयत्न केले.
close